Car Tips : तुमच्या कारमधून काळा धूर निघत असेल तर सावधान, होऊ शकते मोठे नुकसान

Car Tips in Marathi : तुमच्या कारमधून काळा धूर बाहेर पडत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. या काळ्या धुराकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Car Tips : तुमच्या कारमधून काळा धूर निघत असेल तर सावधान, होऊ शकते मोठे नुकसान
Car Tips
| Updated on: Nov 24, 2025 | 5:25 PM

तुम्ही अनेकदा एखाद्या कारमधून काळा धूर बाहेर पडताना पाहिले असेल. तुमच्याही कारमधून असा धूर बाहेर पडत असेल तर ही धोक्याची घंटा आहे. कारण या काळ्या धुराकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. हा काळा धूर का येतो? यामागे काय कारण आहे? या काळ्या धुरामुळे कारचे काय नुकसान होऊ शकते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काळा धूर येण्याची प्रमुख कारणे

कारमधून काळा धूर बाहेर पडण्याची प्रमुख कारणे म्हणजे घाणेरडा एअर फिल्टर, खराब फ्यूल इंजेक्टर, इंजिनमध्ये कार्बन जमा होणे ही आहेत. जर या समस्या त्वरित सोडवल्या नाहीत तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.

  • एअर फिल्टरमध्ये घाण साचणे : धूळ आणि घाण हळूहळू एअर फिल्टरमध्ये जमा होते, यामुळे इंजिनला कमी प्रमाणात हवा मिळते. यामुळे इंजिन जास्त इंधन घेऊ शकते. या प्रक्रियेत इंधन पूर्णपणे जळत नाही आणि ते काळ्या धूराच्या रूपात बाहेर पडते. त्यामुळे आपल्याला कारमधून काळा धूर बाहेर पडताना दिसतो.
  • खराब फ्यूल इंजेक्टर : जर तुमच्या कारचे फ्यूल इंजेक्टर लीक असेल किंवा खराब झालेले असेलस तर या कारणामुळेही कारमधून काळा धूर बाहेर पडतो.

तुमच्या कारमधून काळा धूर बाहेर पडत असेत तर जरा ही विलंब न करता कार तातडीने जवळच्या मेकॅनिक किंवा शोरूममध्ये न्या आणि ती दुरूस्त करून घ्या. कारण या छोट्या समस्या तुम्हालसा भविष्यात मोठ्या खर्चात टाकू शकतात. त्यामुळे योग्य खबरदारी घ्या आणि आर्थिक फटका टाळा.

काळ्या धुरामुळे काय परिणाम होतो?

  • तुमच्या कारमधून काळा धूर बाहेर पडत असेत तर कारचे मायलेज कमी होऊ शकतो. याचाच अर्थ कारला जास्त इंधन लागेल.
  • काळ्या धुराची समस्या असेल तर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर खराब होऊ शकते.
  • तुमची कार खूप काळापासून काळा धूर बाहेर सोडत असेल तर इंजिन लॉक होण्याची समस्या असू शकते. त्यामुळे तुमच्या कारमध्ये ही समस्या असेल तर तातडीने दुरूस्ती करून घ्या.