Ola Electric Scooters वर बंपर सवलत! इतकी स्वस्त झाली ही स्कूटर

Ola Electric Scooters | ओला कंपनीने ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. त्यांना मोठी बचत करता येणार आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर मोठी बचत होईल. कंपनीने S1 मॉडल्सवर 25,000 रुपयांपर्यंतची सवलत दिलेली आहे. ओला कंपनीच्या विविध इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलतीचा पाऊस पडला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर

Ola Electric Scooters वर बंपर सवलत! इतकी स्वस्त झाली ही स्कूटर
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 11:37 AM

नवी दिल्ली | 3 March 2024 : ओलाच्या S1 रेंज इलेक्ट्रिक स्कूटर्सवर कंपनीने बंपर डिस्काऊंट जाहीर केले आहे. या सवलतीचा ग्राहक फायदा घेऊ शकतात. कंपनीने डिस्काऊंटची डेडलाईन वाढवली आहे. आता 31 मार्चपर्यंत स्वस्त किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान तुम्ही ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत असाल तर तुमची 25,000 रुपयांपर्यंतची बचत होईल. या डिस्काऊंट ऑफरसह कंपनी स्कूटर खरेदीवर वाढीव वॉरंटीचा लाभ पण देणार आहे.

वाढीव वॉरंटी

ओला कंपनी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सर्व इलेक्ट्रिक स्कूटरवर 8 वर्ष/80,000 km ची वाढीव वॉरंटी देत आहे. याशिवाय कंपनी त्यांच्या सेवा केंद्राचा विस्तार करत आहे. त्यात अनेक सुधारणा करत आहे. सध्या कंपनीचे देशभरात 414 सर्व्हिस सेंटर आहेत. याठिकाणी ग्राहकांना सेवा देण्यात येते.

हे सुद्धा वाचा

Ola चे डिस्काउंट ऑफर्स

  • Ola S1 Pro Gen 2 : ओला इलेक्ट्रिक नुसार, त्यांची लोकप्रिय ओला एस1 प्रो जेन 2 ची एक्स शोरुम किंमत 1.47 लाख रुपये आहे. पण डिस्काऊंटसह ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांना 1.29 लाख रुपयांमध्ये मिळेल. ग्राहकाला या स्कूटरवर 17,500 रुपये बचत करता येईल.
  • Ola S1 Air : ओला एस1 एअर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे पण स्वस्त झाले आहे. या स्कूटरची किंमत 1.04 लाख रुपये आहे. पूर्वी ही इलेक्ट्रिक स्कूटर 1.19 लाख रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) मिळत होती.
  • Ola S1 X+ : सर्वाधिक सवलत ओला एस1 एक्स प्लस स्कूटरवर मिळत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर 25,000 रुपयांच्या सवलतीसह मिळत आहे. या स्कूटरची मूळ एक्स-शोरूम किंमत 1.09 लाख रुपये आहे. सध्या ही स्कूटर 84,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज जोरदार आहे. ओला एस1 प्रो एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 195 किमीचे अंतर कापते. या स्कूटरची टॉप स्पीड 120 किमी/प्रति तास आहे. सिंगल चार्जमध्ये ओला एस1 एयर 151 किमी रेंज देते. तर ओला एस1 एक्स प्लस फुल चार्जमध्ये 151 किमीचे अंतर कापते. तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत डिस्काऊंट ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.

Non Stop LIVE Update
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.