AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांनो आजपासून पुणे शहरातील वाहतुकीत होणार बदल, बाहेर पडण्यापूर्वी वाचा पर्यायी मार्ग

pune traffic change news: पुण्यातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी दिली.

पुणेकरांनो आजपासून पुणे शहरातील वाहतुकीत होणार बदल, बाहेर पडण्यापूर्वी वाचा पर्यायी मार्ग
Traffic Diversions
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 18, 2024 | 7:05 AM
Share

पुणे शहरातील नागरिकांसाठी महत्वाचा बदल होणार आहे. पुणे मेट्रोचे सुरु असलेल्या कामांमुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. हा बदल १८ मे पासून होणार आहे. पुण्यातील सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरचे बांधकाम करण्यात येणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिमला ऑफिस चौक आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांनी दिली.

असा असणार बदल

  • वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक (एसटी. स्टँड मार्ग) सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात येत आहे. तसेच वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे जाणारा प्रवेश बंद राहील.
  • पर्यायी मार्ग : वीर चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूकडील सेवा रस्त्यावरून चाफेकर चौक डावीकडे वळून न.ता. वाडी – उजवीकडे वळण घेउन सिमला ऑफिस चौकाकडे जाता येईल.
  • फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकातून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहणार आहे.
  • पर्यायी मार्ग : चाफेकर चौक – सरळ न.ता. वाडी चौक उजवीकडे वळून सिमला ऑफिस चौक.
  • न. ता. वाडी चौक ते वीर चाफेकर चौक प्रवेश बंद राहणार आहे.
  • पर्यायी मार्ग : न.ता.वाडी चौकातून डावीकडे वळून सरळ सिमला ऑफिस चौक- उजवीकडे वळून चाफेकर चौक.
  • स. गो. बर्वे चौकाकडून सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडे प्रवेश बंद राहील.
  • वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी. चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

पुणे शहरात मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले आहेत. लवकरच पुणे शिवाजीनगर आणि स्वारगेट मार्ग सुरु होणार आहे. भूयारातून असलेल्या मेट्रोच्या या मार्गासाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. आता लोकसभा निवडणूक निकालानंतर हा मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे.

Follow Us
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या...
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या....