AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Priyanka Chopra : पुन्हा एकदा…प्रियांका चोप्रानं शेअर केली गुड न्यूज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Priyanka Chopra Post : प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे.

Priyanka Chopra : पुन्हा एकदा...प्रियांका चोप्रानं शेअर केली गुड न्यूज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
| Updated on: Nov 07, 2026 | 5:05 PM
Share

प्रियांका चोप्रानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री आणि निर्माती प्रियांका चोप्रा जोनस हिनं आपल्या गाजलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा कामेरकर कुटुंबाची गोष्ट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘व्हेंटिलेटर २’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून दिग्दर्शक राजेश मापुसकर पुन्हा एकदा या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर केली घोषणा

प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेला यंदा 10 वर्षं पूर्ण होत आहेत. याच खास निमित्तानं तिने ‘व्हेंटिलेटर २’ची घोषणा केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिनं पहिल्या चित्रपटाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. प्रियांकाने लिहिलं की, 10 वर्षांपूर्वी, @purplepebblepictures च्या माध्यमातून, मी अशा कथा सांगण्याचं ठरवलं ज्यांना काहीतरी अर्थ आहे. आमच्या कंपनीसाठी ‘व्हेंटिलेटर’ (Ventilator) ही अशाच अत्यंत महत्त्वाच्या कथांपैकी एक होती. एक दशकानंतर, आम्ही पुन्हा एकदा त्या विषयाकडे वळत आहोत, आणि यावेळी सोबत घेऊन आलो आहोत बरंच काही अधिक…’

‘व्हेंटिलेटर २’च्या घोषणेसाठी निर्मात्यांनी एक खास आणि मिश्कील टॅगलाईन वापरली आहे. ‘तेच सगळे कामेरकर, पुन्हा एकदा १० वर्षांनंतर… त्यांच्यातले काही गेले, काही राहिले… गेलेले हसतायत आणि राहिलेले…!’ त्यामुळे पहिल्या भागातील कामेरकर कुटुंबातील कोणकोणती पात्रं पुन्हा दिसणार आणि दहा वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात काय बदल झाले असतील, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाचं दिग्दर्शन राजेश मापुसकर यांनी केलं होतं. आता दुसऱ्या भागासाठीही तेच लेखक आणि दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या चित्रपटाबद्दल बोलताना राजेश मापुसकर म्हणाले की, ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटासोबत त्यांच्या अनेक आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेलं प्रेम आजही त्यांच्या मनात ताजं आहे. तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा त्याच विश्वात परतताना आनंदासोबतच मोठ्या जबाबदारीची जाणीव होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

‘व्हेंटिलेटर २’ची निर्मिती पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगिज पिक्चर्स या बॅनरअंतर्गत केली जाणार आहे. प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधु चोप्रा आणि राजेश मापुसकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मात्र, अद्याप चित्रपटातील कलाकारांची नावं किंवा कथानकाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाचं शूटिंग लवकरच सुरू होणार असून २०२७ मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप पाडली होती. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा कामेरकर कुटुंबाभोवती फिरते. कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तीला रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. या काळात कुटुंबातील नाती, जुने मतभेद, भावनिक प्रसंग आणि विनोदी क्षण उलगडत जातात. या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सुलभा आर्या, विजू खोटे, सतीश आळेकर आणि अच्युत पोतदार यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रियांका चोप्रानेही या चित्रपटात विशेष भूमिका केली होती.

विशेष म्हणजे, या चित्रपटानं तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले होते. राजेश मापुसकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रणासाठीही चित्रपटाला पुरस्कार मिळाले होते.

आता दहा वर्षांनंतर ‘व्हेंटिलेटर २’च्या माध्यमातून कामेरकर कुटुंब पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा