AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : आता भाषणाच्या सुरुवातीला हिंदू का नाही म्हणत ? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis : येत्या 20 मे रोजी सोमवारी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्याच मतदान होणार आहे. त्याआधी ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

Devendra Fadnavis : आता भाषणाच्या सुरुवातीला हिंदू का नाही म्हणत ? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
Devendra Fadnavis Uddhav Thackeray
| Updated on: May 17, 2024 | 2:01 PM
Share

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून कसे लांब गेलेत, ते देवेंद्र फडणवीस यांनी काही मुद्यांमधून दाखवून दिलं. त्यांनी अत्यंत तिखट शब्दात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधी घेण्यात आलेल्या या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

“इतकी वर्ष हिंदू ह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो, भगिनीनो म्हणून करायचे. उद्धव ठाकरे तुम्ही ज्या दिवशी राजकारणात आलात, त्या दिवसापासून, कालपर्यंत ही निवडणूक सुरु होण्याच्या आधीपर्यंत ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो, भगिनीनो म्हणून भाषणाची सुरुवात करायचात. पण इंडिया आघाडीची मुंबईत पहिली सभा झाली, तेव्हापासून तुम्ही हिंदू म्हणण सोडलत. तुम्ही हिंदू म्हणण का सोडलत?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

‘जर, नकली कुठे म्हटलं जात असेल, तर ते इथे’

“हिंदू शब्द उच्चारण्याची लाज वाटते का? तुम्हाला भीती वाटते का, हे म्हटल्यावर ज्यांच्या शरणी गेलोय, ते नाराज होतील. म्हणून तुम्ही हिंदू म्हणण सोडलत. जर, नकली कुठे म्हटलं जात असेल, तर ते इथे. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सुपूत्र आहात. कोणी नाही म्हणू शकत नाही. संपत्तीचा वारसा तुमच्याकडे आहे. पण विचारांचा वारसा उरलेला नाही. विचारांच्या वारशाला तिलांजली दिलीय. विचारांचा वारसा आता एकनाथ शिंदे चालवतात” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.