पेट्रोलच्या एका थेंबाशिवाय धावणार E100 कार, जगात कुठे आहे हे तंत्रज्ञान, भारत नेमका कुठे ?

जगात इथेनॉल कारची क्रेझ वाढत आहे, ब्राझील नंतर आता भारताने देखील E100 कारना हिरवा झेंडा दाखवला आहे. कोण-कोणत्या देशात या कारचा दबदबा आहे. भारतीय बाजाराची नेमकी काय आहे तयारी, वाचा ए टू झेड माहिती...

पेट्रोलच्या एका थेंबाशिवाय धावणार E100 कार, जगात कुठे आहे हे तंत्रज्ञान, भारत नेमका कुठे ?
E100 cars
| Updated on: Oct 27, 2026 | 8:23 PM

देशात महागडे पेट्रोल आणि प्रदुषणाने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी केंद्राने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने भारतात १०० टक्के इथेनॉल म्हणजे E100 आणि E85 इंधनाला कारमध्ये वापर करण्यासाठी कायदेशीर मंजूरी दिली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमात मोठा बदल केल्यानंतर देशात पेट्रोलच्या एक थेंबाशिवाय केवल इथेनॉलवर धावणाऱ्या कारचा रस्ता मोकळा झाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाने न केवळ प्रदुषण कमी होईल तर शेतकऱ्यांच्या उत्पनात देखील वाढ होणार आहे. चला या तंत्रात जगाचे इतर देश कुठे आणि भारत या रेसमध्ये कोणत्या टप्प्यावर पोहचला आहे.

जगात कुठे धावतात E100 कार ?

तुम्हाला E100 इथेनॉलवर कार चालवण्याचा निर्णय नवा वाटत असेल तर तसे बिलकूल नाही. दक्षिण अमेरिकन देश ब्राझील या बाबतीत जगाचा लीडर आहे. ब्राझीलमध्ये १९७९ पासून E100 आधारित वाहने धावत आहे. आज ब्राझीलच्या रस्त्यावर धावणाऱ्या ८० टक्के कार फ्लेक्स फ्युअल तंत्रावर काम करतात.

Loading...

येथील लोकांनी एकाच कारमध्ये त्यांच्या मर्जीने आणि खिशाच्या भरवशावर पेट्रोल वा इथेनॉल भरले तरी कारचे इंजिन आपोआप इंधनाला एडजस्ट करतात. ब्राझीलच्या शिवाय अमेरिकेत देखील मोठ्या संख्या उच्च इथेनॉल ब्लेंडचा वापर केला जातो.

भारताची स्थिती काय आहे ?

या रेसमध्ये भारतात आता खूप मागे नाही. भारत सरकारने अलिकडे केंद्रीय मोटर वाहन नियमात सुधारणा करुन E100 आणि E85 इंधनाला देशात कायदेशीर मंजूरी दिली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या फाईलवर सह्या केल्या आहेत.

आतापर्यंत भारत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिक्स करणे म्हणजे E20 च्या लक्ष्यावर काम करत होता. परंतू या नव्या मंजूरीनंतर आता देशात 100% इथेनॉलवर चालणाऱ्या कारच्या कमर्शियल लाँचचा मार्ग मोकळा झाला आहे.

भारतीय कार कंपन्यांची तयारी

सरकारने मंजूरी दिल्यानंतर आता देशातील मोठ्या कार आणि बाईक कंपन्यांनी आता कंबर कसली आहे. मारुती सुझुकीने आता आपली सर्वात स्वस्त कार WagonR ला फ्लेक्स-फ्युअल व्हर्जन सादर केले आहे. जी E20 पासून ते E100 पर्यंत कोणत्याही मिश्रणावर चालू शकते. या शिवाय टायोटा, हुंडई, टाटा मोटर्स आणि एमजी मोटर सारख्या दिग्गज कंपन्या देखील भारतीय बाजारासाठी आपल्या खास E100 आणि फ्लेक्स – फ्युअल मॉडेलचा वेगाने विकास करत आहेत. हीरो मोटोकॉर्पने देखील इथेनॉलवर धावणारी बाईक सादर केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us