Electric Vehicles | पेट्रोल की EV? विकत घेण्याआधी तुमच्या मनात कंफ्यूजन असेल, तर फायद्याच काय? ते एकदा वाचा

| Updated on: Feb 15, 2024 | 1:56 PM

Electric Cars कारच्या किंमती जास्त असल्यामुळे तुम्ही Petrol Car कडे वळत असाल, तर थोड थांबा. जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रिक कार विकत घ्यावी यासाठी MG Motors आणि Tata Motors ने आपल्या Electric Cars च्या किंमती कमी केल्या. इलेक्ट्रिक की, पेट्रोल? कुठली कार विकत घेण फायद्याच समजून घ्या.

Electric Vehicles | पेट्रोल की EV? विकत घेण्याआधी तुमच्या मनात कंफ्यूजन असेल, तर फायद्याच काय? ते एकदा वाचा
petrol or ev
Image Credit source: Freepik
Follow us on

Electric Vehicles | Electric Cars ची मार्केटमधये डिमांड वाढतेय. पण अजूनही काही लोक इलेक्ट्रिक ऐवजी पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या विकत घेत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी Electric Vehicles विकत घ्यावी यासाठी सरकार फक्त सब्सिडीच देत नाहीय, तर ऑटो कंपन्यांनी पण EV चा सेल्स वाढवण्यासाठी काही उपाय शोधून काढलेत. इलेक्ट्रिक कार तुम्हाला विकत घ्यायची असते, पण किंमत ऐकल्यानंतर तुमचा इरादा बदलतो. आता ऑटो कंपन्यांनी यावर तोडगा काढलाय. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी होण्यास सुरुवात झालीय. काही दिवसांपूर्वी MG Comet EV ची किंमत कमी झाली, तर टाटा मोटर्सने Tiago EV आणि Nexon EV च्या किंमतीत मोठी कपात केली.

आता इलेक्ट्रिक गाड्यांच्या किंमती कमी होत आहेत, तर मनात प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे, की पेट्रोल कार विकत घ्यायची की, इलेक्ट्रिक कार? तुमच्यामनात सुद्धा या बद्दल कंफ्यूजन असेल, तर तुम्ही दोन कार्सचे फायदे समजून घ्या.

पेट्रोल कारचे फायदे

देशभरात पेट्रोल पंपांची संख्या जास्त आहे. पेट्रोल सहज उपलब्ध होतं.

पेट्रोल कारमध्ये भरण्यास खूपच कमी वेळ लागतो.

तुम्हाला प्रत्येक कारमध्ये पेट्रोल मॉडेल मिळेल. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत.

EV चे फायदे

पेट्रोलच्या तुलनेत EV ची रनिंग कॉस्ट कमी आहे.

पेट्रोलच्या तुलनेत EV मुळे प्रदूषण होत नाही. वातावरणासाठी या कार चांगल्या आहेत.

पेट्रोल कार चालवताना थोडाफार आवाज येतो. पण EV कारच्या बाबतीत असं होत नाही.

का निवडा पेट्रोल कार?

कमी बजेटमध्ये गाडी विकत घ्यायची असेल, तर पेट्रोल कार उपलब्ध आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उत्तम.

EV चार्जिंग स्टेशन्स कमी आहेत. त्या तुलनेत पेट्रोल कार चांगला पर्याय.

अधिक मॉडल आणि वरायटीमुळे ऑप्शन्स मिळतात.

का निवडा EV?

कमी रनिंग कॉस्ट हवी असेल, तर इलेक्ट्रिक गाडी निवडा.

वातावरणाच नुकसान होत नाही.

सब्सिडीचा फायदा.

EV आणि पेट्रोल कारमध्ये निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेच आहे. घरात EV चार्जिंग सेटअपसाठी जागा हवी. रोजचा तुमचा प्रवास किती आहे? तुमच्या शहरात EV चार्जिंग स्टेशन आहे का? तुमच्या राज्यात EV वर किती सब्सिडी मिळतेय? पेट्रोल आणि EV मध्ये काही फायदे-तोटे आहेत. तुमच्या दृष्टीने फायद्याच काय? हे ठरवून तुम्ही निवड करु शकता.