AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! बडा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचं बळ वाढणार

मोठी बातमी समोर येत आहे, ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे, बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं काँग्रेसचं महापालिका निवडणुकीत बळ वाढणार आहे.

मोठी बातमी! बडा नेता करणार काँग्रेसमध्ये प्रवेश, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाचं बळ वाढणार
congressImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 25, 2025 | 6:04 PM
Share

राज्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत, मुदत संपल्यानंतर अनेक वर्षांनी महापालिकांच्या निवडणुका होत असल्यानं या निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या आहेत. दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता आघाडी आणि युतीची बोलणी सुरू झाली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार जिथे-जिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही, तिथे अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करणार आहे. पुण्यात देखील असंच चित्र आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करण्याची शक्यता आहे.

मात्र या युतीला पुण्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला होता, मात्र त्यांच्या विरोधानंतरही या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशांत जगताप यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते आता  काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुण्यामध्ये काँग्रेसची ताकद वाढण्याची शक्यात आहे. तर दुसरीकडे रोज नई सुबहा होती है, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशांत जगताप यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतरही आपण महापालिका निवडणूक लढवणार असल्याचं प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलं आहे, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दोन्ही शिवसेनेकडून जगताप यांना पक्षप्रवेशासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र वैचारिक भूमिका पहाता ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काहीही झालं तरी भाजपमध्ये जाणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.  

मुंबईतील काँग्रेस भवनात पुणे महापालिका निवडणूक आणि जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी पुण्याचे प्रभारी सतेच पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवरांची उपस्थिती आहेत, आणि आजच प्रशांत जगतापही मुंबईत दाखल झाल्यानं काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. 

शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.