होंडाची शानदार New CB200X बाईक बाजारात, 2,000 रुपयांत बुकिंग करा

| Updated on: Sep 10, 2021 | 8:19 PM

होंडाने (Honda) गेल्या महिन्याच्या अखेरीस नवीन एडीव्ही (New Honda CB200X) भारतीय बाजारात 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीसह लाँच केली आहे. नवीन मोटरसायकल हॉर्नेट 2.0 वर आधारित आहे.

होंडाची शानदार New CB200X बाईक बाजारात, 2,000 रुपयांत बुकिंग करा
Follow us on

मुंबई : होंडाने (Honda) गेल्या महिन्याच्या अखेरीस नवीन एडीव्ही (New Honda CB200X) भारतीय बाजारात 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीसह लाँच केली आहे. नवीन मोटरसायकल हॉर्नेट 2.0 वर आधारित आहे आणि रोडस्टरकडून इंजिन आणि प्लॅटफॉर्म घेतलं आहे. नवीन ADV ला भारतीय बाजारात थेट प्रतिस्पर्धी नाही. ही बाईक ग्राहकांच्या खूप वेगळ्या समूहाला आकर्षित करते. ही बाईक Royal Enfield Himalayan आणि Hero XPulse 200 ADVs च्या रेंजमध्ये येते. (Honda affordable ADV CB200X booking started with 2000 rs token amount)

Honda ADV च्या मध्यभागी 184 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. हे पॉवरट्रेन 17 एचपीची मॅक्सिमम पॉवर जनरेट करतं, तसेच 16 एनएम टॉर्क सपोर्टेड आहे. इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. नवीन एडीव्हीचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल मीटर कन्सोल. यासंदर्भात, होंडा कंपनी दावा करते की, रायडिंग पोजिशनची पर्वा न करता चांगली व्हिजिबिलिटी देते. ही बाईक गियर पोझिशन इंडिकेटर, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर आणि बॅटरी व्होल्टमीटर सारखी माहिती 5-लेव्हल अॅडजस्टेबल ब्राइटनेससह प्रदान करते.

तरुणांना रायडिंगचा शानदार अनुभव मिळेल

नवीन एडीव्ही पर्ल नाईटस्टार ब्लॅक, मॅट सेलिन सिल्व्हर मेटॅलिक आणि स्पोर्ट्स रेड या तीन शानदार कलर ऑप्शनसह उपलब्ध आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अत्शुशी ओगाटा यांनी सांगितले की, “आज, होंडाच्या जुन्या सीबी वारशाने प्रेरित नवीन मोटरसायकल सादर करताना मला आनंद होत आहे. भारतीय तरुणांची बदलती जीवनशैली लक्षात घेऊन, CB200X आजच्या तरुणांना एक रोमांचक रायडिंगचा अनुभव प्रदान करते, जी त्यांना अधिक अॅडव्हेंचरसाठी प्रेरित करते.

नव्या Honda CB200X मध्ये काय आहे खास?

नवीन होंडा CB200X मध्ये ऑल-एलईडी लायटिंग पॅकेज-पोजिशन लॅम्पसह एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेललॅम्प समाविष्ट आहेत. Winkers कव्हरमध्ये ठेवले आहेत. मोटरसायकल पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंजिन स्टॉप स्विच, हॅझर्ड स्विच, स्प्लिट सीट, अपस्वेप्ट एक्झॉस्ट, अंडर काउल आणि सिंगल-चॅनेल एबीएस यांचा समावेश आहे.

Honda CB200X ची बुकिंग आधीपासूनच ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सुरु आहे. 2,000 रुपये भरून ग्राहक ही बाईक बुक करु शकतात. या बाईकची डिलिव्हरी सप्टेंबर 2021 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

इतर बातम्या

टाटाची नवी 10 लाख रुपयांची एसयूव्ही, जाणून घ्या काय आहे नाव आणि कधी होणार लाँच

निसान किक्स एसयूव्हीवर एक लाख रुपयांची सूट, विशेष लाभमध्ये 2 ग्रॅम सोन्याचे नाणे देखील देतेय कंपनी

टेस्लाचे ‘फुल सेल्फ-ड्रायव्हिंग’ सॉफ्टवेअर या महिन्यात लाँच होणार, एक वर्षापासून सुरू आहे चाचणी

(Honda affordable ADV CB200X booking started with 2000 rs token amount)