टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देणार होंडाची नवीन 7 सीटर कार, लुकची होतेय प्रचंड चर्चा

टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देण्यासाठी होंडाची नवी 7-सीटर SUV येणार. 1 डिसेंबरला होणार लॉन्च. मिळणार हायब्रिड इंजिन. लुक पाहून सर्वच थक्क.

टोयोटा फॉर्च्युनरला टक्कर देणार होंडाची नवीन 7 सीटर कार, लुकची होतेय प्रचंड चर्चा
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 11, 2026 | 3:48 PM

होंडा कंपनी आता फुल-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आगामी Honda Avancier या नवीन 7-सीटर एसयूव्हीचा पहिला टीझर रिलीज केला आहे. या कारचा ग्लोबल डेब्यू 1 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी टोयोटा आपली नवीन जनरेशन फॉर्च्युनर सादर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात होंडा अव्हान्सियर आणि टोयोटा फॉर्च्युनर यांच्यात जोरदार स्पर्धा पाहायला मिळू शकते. जवळपास 5 मीटर लांबीची ही एसयूव्ही नवीन जनरेशन हायब्रिड तंत्रज्ञानासह बाजारात येण्याची शक्यता आहे.

होंडा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत CR-V विकते. मात्र, नवीन Avancier ला CR-V पेक्षा वरच्या स्थानावर ठेवले जाणार आहे. ही केवळ CR-V ची मोठी आवृत्ती नसून कंपनीची स्वतंत्र फुल-साइज एसयूव्ही असेल.

Loading...

रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीची लांबी 4,960 मिमी, रुंदी 1,950 मिमी आणि उंची 1,690 मिमी असू शकते. म्हणजेच तिची लांबी जवळपास 5 मीटर असेल. यामध्ये तीन रोमध्ये 7 प्रवाशांना बसण्याची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, कंपनीने अद्याप तिचे अधिकृत आकारमान आणि सीटिंग कॉन्फिगरेशन जाहीर केलेले नाही.

आकर्षक डिझाइन आणि LED लाइटिंग

होंडाने जारी केलेल्या पहिल्या टीझरमध्ये कारचे संपूर्ण डिझाइन दाखवलेले नाही. मात्र, तिच्या एक्सटीरियरमधील काही महत्त्वाचे फीचर्स समोर आले आहेत. पुढील बाजूला स्लिम LED DRLs देण्यात आले आहेत. तर मुख्य LED हेडलॅम्प्स बंपरच्या खालच्या भागात असल्याने स्प्लिट हेडलॅम्प डिझाइन पाहायला मिळते.

कारच्या साइड प्रोफाइलमध्ये लांब बॉडी आणि आकर्षक शोल्डर लाइन दिसते. मागील बाजूला दोन्ही टेललॅम्प्सना जोडणारी फुल-विड्थ LED लाइट बार मिळण्याची शक्यता आहे. यामुळे कारला H-शेप लाइटिंग सिग्नेचर मिळते. टेलगेटवर Avancier अशी बॅजिंगही पाहायला मिळते.

नवीन जनरेशन हायब्रिड इंजिन मिळणार?

या एसयूव्हीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे संभाव्य हायब्रिड पॉवरट्रेन. रिपोर्ट्सनुसार, Honda Avancier मध्ये इलेक्ट्रिक मोटर्ससह अपडेटेड 2.0-लिटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. हे होंडाच्या सध्याच्या हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित असेल. मात्र, अधिक चांगले मायलेज आणि दमदार परफॉर्मन्स मिळावा यासाठी त्यात सुधारणा करण्यात येण्याची शक्यता आहे.

याशिवाय, या एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिक ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टमही मिळू शकते. मात्र, कंपनीने अद्याप इंजिनची पॉवर, टॉर्क, मायलेज आणि हायब्रिड सिस्टमविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us