भारतात तुफान विक्री होणारी ‘ही’ कार सुरक्षेच्या बाबतीत नापास, NCAP क्रॅश टेस्टमध्ये 0-स्टार रेटिंग

| Updated on: Aug 29, 2021 | 8:10 AM

लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (NCAP) अलीकडेच या प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्ट या कारची क्रॅश-टेस्ट केली.

भारतात तुफान विक्री होणारी ही कार सुरक्षेच्या बाबतीत नापास, NCAP क्रॅश टेस्टमध्ये 0-स्टार रेटिंग
Swift in Latin Ncap Crash Test
Follow us on

मुंबई : लॅटिन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम किंवा लॅटिन एनसीएपीने (NCAP) अलीकडेच या प्रदेशात विकल्या जाणाऱ्या सुझुकी स्विफ्ट या कारची क्रॅश-टेस्ट केली. सुरक्षा वॉचडॉगकडून या कारला शून्य-स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅटिन NCAP द्वारे चाचणी केलेली कार मारुती सुझुकी मोटर गुजरात मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनवण्यात आली आहे, म्हणजेच ती मेड इन इंडिया कार आहे. कारला अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनच्या बाबतीत 15.53 टक्के रेटिंग मिळालं आहे, तर लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत या कारला 0 टक्के रेटिंग मिळालं आहे. (Made in India Maruti Suzuki Swift fails in Latin NCAP crash test, Scored zero star rating)

पादचारी सुरक्षा आणि असुरक्षित ट्रॅक वापरकर्त्यांसाठी कारने 66 टक्के स्कोर केला आहे. तरीही सुरक्षा सहाय्य प्रणालीच्या (सिक्योरिटी असिस्टन्स सिस्टम) संदर्भात रेटिंग पुन्हा 7 टक्क्यांवर घसरले. त्यांच्या अहवालात, लॅटिन एनसीएपीने म्हटलं आहे की, खराब साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन आणि चाचणी दरम्यान खुला दरवाजा यामुळे कारला 0 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. स्टँडर्ड साइड हेड प्रोटेक्शन एअरबॅग्सची कमतरता, स्टँडर्ड ESC ची कमतरता आणि चाचणीसाठी CRS ची शिफारस न करण्याचा सुझुकीचा निर्णय यामुळे कारचा व्हिप्लॅश स्कोअर देखील कमी होता.

लॅटिन NCAP ने असेही म्हटले आहे की, कारचा दरवाजा उघडल्याने UN95 नियमन आवश्यकता पूर्ण होणार नाही. वॉचडॉगने अहवाल दिला की, युरोपमध्ये स्विफ्ट 6 एअरबॅग आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोलसह (ईएससी) स्टँडर्ड म्हणून विकली जाते, तर लॅटिन अमेरिकेतील मॉडेल साइड बॉडी आणि हेड एअरबॅग आणि ईएससी स्टँडर्डसह दिले जात नाही.

कस्टमर्स कोबेसिक सेफ्टी फीचर गरजेचं

लॅटिन एनसीएपीचे जनरल सेक्रेटरी अलेजांद्रो फ्युरेस म्हणाले, मूलभूत वाहन सुरक्षा, जी मेच्यॉर अर्थव्यवस्थेच्या बाजारपेठांमध्ये स्टँडर्ड आहे. लॅटिन अमेरिकन ग्राहकांनी त्यांच्यासाठी अतिरिक्त पैसे न देता दावा केला पाहिजे. ही सुरक्षा वैशिष्ट्ये रस्ते अपघातांमध्ये एखाद्या लसीप्रमाणे काम करतात. ग्राहकांना यासाठी अधिक पैसे न देता पुरवठा करण्यात येत असलेली लस मिळवण्याचा अधिकार आहे.

स्विफ्टला भारतीयांची पसंती

भारतातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीसाठी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift) ही कार आतापर्यंतची सर्वात मोठी पॉवर प्लेयर ठरली आहे. कंपनीने आतापर्यंत या कारच्या 24 लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री केली आहे. ही कार गेल्या काही वर्षांपासून भारतातील बेस्ट सेलिंग कार ठरत आहे. तसेच 2020 मध्येदेखील या कारने भारतीय मार्केटमध्ये दमदार प्रदर्शन केलं आहे. परंतु भारतीयांच्या पसंतीस उतरलेली ही कार सेफ्टीच्या (सुरक्षिततेच्या) बाबतीत खूपच मागे पडली आहे.

2020 मध्ये भारतात 1,60,700 युनिट्सची विक्री

स्विफ्ट 2020 मध्ये भारतात सर्वाधिक विक्री झालेली कार ठरली आहे. 2020 मध्ये या कारच्या 1,60,700 युनिट्सची विक्री झाली आहे. भारतीय बाजारात स्विफ्टची स्थिती दिवसेंदिवस अधिक बळकट होत आहे. तर दुसऱ्या बाजूला ही कार सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमजोर ठरली आहे. तरीदेखील या कारची मागणी मोठी आहे. या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच कमी रेटिंग मिळालं आहे.

Global NCAP रेटिंगमध्ये केवळ 2 स्टार

ग्लोबल एसीएपी (Global NCAP) रेटिंगमध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट या कारला केवळ 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तसेच ही कार जास्त वजन उचलण्यात सक्षम नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या कारची सुरुवातीची किंमत (एक्स शोरुम) 5.19 लाख रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये बीएस-6 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 83 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करु शकतं. हे इंजिन 5-स्पीड मॅनुअल आणि 5-स्पीड AMT गियरबॉक्सच्या पर्यायासह सादर करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी ‘BH’ दिसणार, नव्या पॉलिसीचा ‘या’ वाहनधारकांना फायदा

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचे उत्पादन कमी करा; नितीन गडकरींच्या कंपन्यांना सूचना

सिंगल चार्जमध्ये 160 किमी रेंज, eBikeGo ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच, किंमत…

(Made in India Maruti Suzuki Swift fails in Latin NCAP crash test, Scored zero star rating)