
भारतात एकापेक्षा एक कार आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्यामधील फीचर्स आणि मायलेज पाहून अनेकांना कोणती कार घ्यावी हे ठरवणे अवघड होत चाललं आहे. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत जी नोव्हेंबर 2025 मध्ये लॉन्च झाली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठा टप्पा गाठत आपली नवी इलेक्ट्रिक 7-सीटर SUV Mahindra XEV 9S नोव्हेंबरमध्ये लॉन्च केली होती. ही SUV नुकत्याच सादर झालेल्या XUV 7XO ची इलेक्ट्रिक आवृत्ती असून तिची एक्स-शोरूम किंमत 19.95 लाख रुपयांपासून सुरू होते. भारतातील पहिली इलेक्ट्रिक 7-सीटर SUV म्हणून XEV 9S कडे पाहिले जात आहे.
कंपनीने SUV लॉन्च केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तिच्या बुकिंगची घोषणा केली आहे. आज 14 जानेवारी 2026 पासून XEV 9S चे बुकिंग सुरू होत असून 23 जानेवारी 2026 पासून ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होणार आहे.
दमदार बॅटरी आणि परफॉर्मन्स
महिंद्रा XEV 9S ही कंपनीच्या अत्याधुनिक INGLO आर्किटेक्चर वर आधारित कार आहे. या इलेक्ट्रिक SUV कारमध्ये तीन बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. ज्यामध्ये या कारचा पॉवरफुल बॅटरी सेटअप XEV 9S ला परफॉर्मन्स आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही कार सक्षम आहे.
डिझाइनच्या बाबतीत बोलायचं झालं तर XEV 9S ला आधुनिक, इलेक्ट्रिक लुक देण्यात आला आहे. यामध्ये एल-आकाराचे LED DRLs, हेडलॅम्प्स, फ्रंटला आकर्षक LED लाइट बार, याशिवाय फ्लश डोअर हँडल्स, एअरो-स्टाइल अलॉय व्हील्स, रूफ रेल्स, शार्क-फिन अँटेना आणि समोर-मागे महिंद्रा इलेक्ट्रिक लोगो SUV च्या लुकला प्रीमियम टच देताना दिसत आहे.
आरामासाठी अनेक लक्झरी फीचर्स
XEV 9S मध्ये प्रवाशांच्या आरामासाठी अनेक लक्झरी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये पावर्ड बॉस मोड, रिक्लाइन आणि स्लाइडिंग अॅडजस्टमेंट, वेंटिलेटेड सेकंड-रो सीट्स आणि सनशेड. त्यासोबत वायरलेस फोन चार्जिंग, तीन अॅम्बिएंट मोड्ससह LiveYourMood इंटरफेस, BYOD (Bring Your Own Device) सपोर्ट आणि ट्रान्सलुसंट डोअर इन्सर्ट्स केबिनला फ्युचरिस्टिक लुक देते. त्यामुळे जर तुम्हाला ही कार घेयची असेल तर तुम्हाला आज ती बुकिंग करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ही कार 23 जानेवारी रोजी मिळेल.