AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांना बंदी, फक्त महिलांनाच एन्ट्री, त्या उत्सवात असं काय घडतं?

Festival for Woman : केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अट्टुकल भगवती मंदिरात प्रसिद्ध पोंगल उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव जगातील महिलांच्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो.

पुरुषांना बंदी, फक्त महिलांनाच एन्ट्री, त्या उत्सवात असं काय घडतं?
Pongal for WomanImage Credit source: Google
| Updated on: Mar 03, 2026 | 7:47 PM
Share

भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. भारतातील सर्व उत्सवात पुरूष आणि महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र केरळच्या तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील अट्टुकल भगवती मंदिरात प्रसिद्ध पोंगल उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव जगातील महिलांच्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. या उत्सवाची 2009 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. त्या वर्षी, एका दिवशी सुमारे 25 लाख महिलांनी धार्मिक विधींमध्ये भाग घेतला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या उत्सवात लाखो महिला अट्टुकल भगवती मंदिरात प्रमुख देवतेला पोंगल अर्पण करण्यासाठी जमतात. पोंगल हा तांदूळ, गूळ आणि नारळापासून बनवलेला पारंपारिक गोड नैवेद्य आहे, जो महिला खुल्या जागेत मातीच्या भांड्यांमध्ये शिजवतात आणि देवीला आदराने अर्पण करतात. या उत्सवाच्या दिवशी अट्टुकल शहरात विशेष वाहतूक आणि पार्किंग निर्बंध लादण्यात येतात. दरवर्षी साजरा होणारा हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून महिलांच्या सामूहिक शक्ती, समर्पण आणि सांस्कृतिक परंपरेचे एक अद्भुत उदाहरण आहे.

अट्टुकल पोंगल म्हणजे काय?

तिरुअनंतपुरममधील अट्टुकल भगवती मंदिरात दरवर्षी या उत्सवाचा आयोजन केले जाते. अट्टुकल पोंगल हा मल्याळम महिन्यातील कुंभम (फेब्रुवारी-मार्च) मध्ये साजरा केला जाणारा 10 दिवसांचा उत्सव आहे. पौर्णिमेच्या दिवशी येणारा नववा दिवस पोंगल दिन म्हणून साजरा केला जातो. या खास दिवशी लाखो महिला मंदिर परिसरात आणि मातीच्या भांड्यांमध्ये पवित्र तांदळाची खीर (पोंगल) तयार करतात आणि देवीला अर्पण करण्यासाठी एकत्र येतात.

केवळ महिलांचा उत्सव

अट्टुकल पोंगल या उत्सवाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उत्सव केवळ महिलांसाठी आहे. या खास दिवशी विविध समुदाय, शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमीतील महिला एकत्र येतात. एका रांगेत चुली पेटवतात आणि नैवेद्य तयार करतात. या दिवशी महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून दूर राहतात आणि केवळ देवीच्या पूजेची तयारी करतात. या उत्सवाच्या दिवशी फक्त पुजारी, मंदिर व्यवस्थापक आणि सुरक्षा कर्मचारीच या पुरूषांना मंदिराजवळ जाण्याची परवानगी असते.

या उत्सवाची सुरुवात अदुप्पुवेट्टु नावाच्या विधीपासून होते. यात मुख्य पुजारी मंदिराच्या आत पंडारायदुप्पु (विशेष चुली) पेटवतात. हा विधी पौर्णिमा आणि पूरम नक्षत्राच्या शुभ संयोगादरम्यान संपतो. मुख्य पुजाऱ्यांच्या इशाऱ्यावर, महिला चुली पेटवतात आणि पोगल तयार करतात. मंदिर परिसरात हजारो लहान चुली पेटल्या जातात, त्यामुळे एक खास दृश्य तयार होते. मंदिराच्या परिसरात खीरचा सुगंध आणि देवीची स्तुती करणारे मधुर संगीत एक आध्यात्मिक उर्जा तयार करते. यानंतर देवीची कथा, “कन्नकी चरितम्” गायली जाते. संध्याकाळी पुजारी आकाशातून फुले व पवित्र पाणी शिंपडून विधी संपवतात.

Follow Us
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?
इराण–इस्त्रायल युद्धावर भारताची भूमिका कुठे?.
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा
जय श्रीराम म्हणा सर्व काही मिळेल;गॅस टंचाईवरून राऊतांचा सरकारवर निशाणा.
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?
विधानभवन, मेट्रो, स्टॉक एक्सचेंज उडवण्याची धमकी?.
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप
युद्धाचा परिणाम घरगुती गॅस सिलेंडरवर, थेट पोलीस बंदोबस्तात वाटप.
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.