
भारतीय कार कंपनी महिंद्राने सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही XUV300 नवीन इंजिनसह अपडेट केले आहे. 1 एप्रिलपासून, उत्सर्जनासंदर्भात कठोर नियम लागू होणार आहेत. त्यामुळे कंपनीने लाइनअपमध्ये बदल केले आहेत. आता नवीन एसयुव्ही इथेनॉल आधारित E20 इंधनालाही सपोर्ट करेल. (Photo: Mahindra)

कंपनीने गाडीच्या इंजिनमध्ये काळानुरूप बदल केला खरा पण यामुळे खिशावर ताण पडणार आहे. कंपनीने XUV300 ची किंमत 22 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. ही किंमत या महिन्यापासूनच लागू होणार आहे. (Photo: Mahindra)

महिंद्रा XUV300 च्या किमतीत किमान 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल व्हर्जनमध्ये W6 ऑटोमॅटिक खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये जास्त मोजावे लागतील. दुसऱ्या वर्जनसाठी 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख ते 13.21 लाख रुपये आहे.(Photo: Mahindra)

टर्बो-पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाले तर W6 आणि W8 व्हेरियंटमध्येही किमान 15,000 रुपयांची वाढ झाली आहे. SUV चे टॉप 2 प्रकार – W8(O) आणि W8(O) Dual-Tone – च्या किमतीत रु. 20,000 ची वाढ झाली आहे. टर्बो पेट्रोल इंजिन प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख ते 13.10 लाख रुपये आहे. (Photo: Mahindra)

महिंद्राने डिझेल प्रकारात सर्वाधिक वाढ केली आहे. कंपनीने सनरूफसह येणाऱ्या W8 व्हेरिएंटच्या किंमतीत 20,000 रुपयांची वाढ केली आहे. तर, टॉप-स्पेक W8(O) मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि ड्युअल-टोन व्हेरियंटला 22,000 रुपयांची वाढ केली आहे. डिझेल एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 9.80-14.14 लाख रुपये आहे. (Photo: Mahindra)