या कारवर मिळतोय तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट, शोरुममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी, 27 किमी मायलेज, किंमत फक्त…

दिवाळीच्या मुहूर्तावर या कारवर मिळतोय तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट. 27 किमी मायलेज आणि किंमत देखील सर्वात कमी. घेण्यासाठी ग्राहकांची शोरुममध्ये प्रचंड गर्दी.

या कारवर मिळतोय तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंत डिस्काऊंट, शोरुममध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी, 27 किमी मायलेज, किंमत फक्त...
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 03, 2026 | 2:04 PM

दिवाळीच्या सणात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मारुती सुझुकीकडून नोव्हेंबर 2026 मध्ये आपल्या विविध कार मॉडेल्सवर आकर्षक सवलती दिल्या जात आहेत. यामध्ये कंपनीच्या प्रीमियम NEXA रेंजमधील लोकप्रिय SUV मारुती सुझुकी ग्रँड विटारा चाही समावेश आहे. या कारच्या खरेदीवर ग्राहकांना तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे.

या ऑफरमध्ये रोख सवलतीसह एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि इतर फायदे दिले जात आहेत. विशेष म्हणजे, स्ट्राँग हायब्रीड व्हेरिएंटवर सर्वाधिक सवलत मिळत आहे.

Loading...

ग्रँड विटाराच्या स्ट्राँग हायब्रीड व्हेरिएंटवर सर्वाधिक सूट

मारुती सुझुकी ग्रँड विटाराच्या स्ट्राँग हायब्रीड व्हेरिएंटवर नोव्हेंबर 2026 मध्ये एकूण 2.25 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतचा कन्झ्युमर डिस्काउंट म्हणजेच थेट रोख सवलत, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट ऑफरचा समावेश आहे.

तीन इंजिन पर्यायांचा मिळतो पर्याय

मारुती ग्रँड विटारामध्ये ग्राहकांना तीन प्रकारचे इंजिन पर्याय मिळतात. यामध्ये 1.5-लिटर पेट्रोल माइल्ड हायब्रीड, 1.5-लिटर पेट्रोल स्ट्राँग हायब्रीड आणि 1.5-लिटर पेट्रोल CNG इंजिनचा समावेश आहे.

या SUV मध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या गरजेनुसार योग्य व्हेरिएंट निवडता येतो.

ग्रँड विटाराचे मायलेज किती?

मायलेजच्या बाबतीतही ग्रँड विटारा ग्राहकांसाठी महत्त्वाचा पर्याय ठरते. कंपनीने दिलेल्या ARAI प्रमाणित आकडेवारीनुसार, या कारचे इंजिननुसार मायलेज पुढीलप्रमाणे आहे. पेट्रोल मॅन्युअल 21.11 किमी प्रति लिटर. पेट्रोल ऑटोमॅटिक 20.58 किमी प्रति लिटर. स्ट्राँग हायब्रीड e-CVT 27.97 किमी प्रति लिटर. CNG व्हेरिएंट 26.6 किमी प्रति किलो.

प्रत्यक्ष वापरात मात्र मायलेज रस्त्यांची स्थिती, वाहतूक, ड्रायव्हिंगची पद्धत आणि एसीच्या वापरावर अवलंबून बदलू शकते. शहरात पेट्रोल व्हेरिएंट साधारण 15 ते 18 किमी प्रति लिटर, तर हायवेवर 18 ते 23 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते.

ग्रँड विटाराची किंमत किती?

ग्रँड विटारामध्ये आधुनिक फीचर्सची मोठी यादी देण्यात आली आहे. यामध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅम्बियंट लाइटिंग आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले यांसारख्या सुविधांचा समावेश आहे.

भारतीय बाजारात मारुती सुझुकी ग्रँड विटाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.77 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 19.77 लाख रुपयांपर्यंत जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us