आली रे आली सुझुकीची नवीन Swift आली… आतून बाहेरुन अनेक बदल

| Updated on: Aug 24, 2022 | 12:00 PM

मारुती सुझुकीची स्वीफ्ट 2023 या वर्षी डिसेंबरमध्ये लॉंच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अपकमिंग कारच्या इंटेरिअल आणि एक्सटेरिअलमध्ये अनेक बदल बघायला मिळतील अशी चर्चा आहे. नुकतीच ही अपकमिंग कार कॅमेऱ्यात टिपण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये याबाबत बरीच उत्सूकला लागली आहे.

आली रे आली सुझुकीची नवीन Swift आली… आतून बाहेरुन अनेक बदल
Maruti Swift CNG (File photo)
Image Credit source: social
Follow us on

जर तुम्ही देखील हॅचबॅक (hatchback) सेगमेंटमध्ये नवीन कार घेण्याच्या विचारात असाल आणि तुम्ही कुठली कार घ्यावी या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला सध्याच्या सेगमेंटमधील कोणतीही कार आवडत नसेल तर आज आम्ही तुम्हाला एका नवीन कारबद्दल माहिती देणार आहोत. या कारचे नाव सुझुकी स्वीफ्ट (Suzuki Swift 2023) असून डिसेंबरमध्ये ती ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये आतील आणि बाहेरील (Interior-Exterior) भागात नवे बदल पाहायला मिळतील असे बोलले जात आहे. अलीकडे ही कार अनेकदा कॅमेऱ्यांत कैद झाली आहे. त्यामुळे या कारच्या लूकबाबत ग्राहकांमध्ये चर्चा रंगली आहे. गाडीवाडी नावाच्या वेबसाइटवर लिस्टेड झालेल्या माहितीनुसार, ही कार डिसेंबर 2022 मध्ये लॉंच केली जाऊ शकते, परंतु कंपनीने अद्याप तिच्या लॉंचची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु एका माहितीनुसार ती कार प्रथम जपानी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

ऑटो एक्स्पो दिसणार जलवा

रिपोर्ट्सनुसार, मारुतीची ही नवीन हॅचबॅक कार पुढील वर्षात भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पो दरम्यान देखील ही कार लॉंच करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मारुती बलेनोचा एसयूव्ही सेगमेंट ऑटो एक्सपो दरम्यान लिस्ट केला जाऊ शकतो.

कसा असेल कारचा लूक?

नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार या अपकमिंग कारमध्ये नवीन व्हेरिएंटची डिझाइन दिसण्याची शक्यता आहे. यात स्नीक पीक डिझाइन असेल. यासोबतच नवीन ग्रील डिझाईन आणि शार्प एलईडी लाईट दिसतील, यामध्ये दिवसा चालणारे लाईट्‌स देखील उपलब्ध असतील. तसेच नवीन बंपरमध्ये नवीन एअर इनटेक ग्रिल उपलब्ध असेल. यामध्ये फॉग लॅम्पही जुन्या व्हर्जनपेक्षा अधिक आकर्षक देण्यात येणार आहे..

मोठी बूट स्पेस मिळेल

या कारमध्ये नवीन इंटीरियर आणि नवीन इन्फोटेनमेंट कंसोल पाहायला मिळणार आहे. याशिवाय आणखी चांगली स्पेस देण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल. तसंच नवीन बॉडी वर्कही यात पाहायला मिळणार आहे. त्यात नवीन डिझाइनचे अलॉयज पाहायला मिळतील. त्यात नवीन एलईडी टेल लाईट्सही दिसणार आहेत.