
ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक इलेक्ट्रिक कार लाँच होत असतात. या क्षेत्रात काही कंपन्या आघाडीवर आहे. त्यातील एक कंपनी म्हणजे टोयोटा त्यांच्या आगामी कार सेगमेंटमध्ये ग्राहकांसाठी वेगवेगळे पॉवरट्रेन पर्याय देण्याची योजना आखत आहे. तर त्यांच्या स्ट्राँग हायब्रिड हे आतापर्यंतचे त्यांचे सर्वात मोठे ट्रम्प कार्ड राहिले आहे. काही वर्षांपूर्वी टोयोटाने इंडोनेशियातील GIIAS मध्ये इनोव्हा क्रिस्टाची संपूर्ण इलेक्ट्रिक संकल्पना प्रदर्शित केली. आता, टोयोटाने बॅटरीवर चालणाऱ्या इनोव्हा क्रिस्टाची आणखी एक कॉन्सेप्ट सादर केली आहे. त्याचवेळी टोयोटाला तगडी टक्कर देण्यासाठी मारुती कंपनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपली ताकद दाखवण्याची तयारी करत आहे. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे या दोन वर्षांत ६-७ इलेक्ट्रिक वाहने सादर करू शकतात.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिक कार
भारतीय बाजारात येणाऱ्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिक कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, इनोव्हा क्रिस्टा इलेक्ट्रिकमध्ये 59.3 kWhची लिथियम आयन बॅटरी मिळू शकते. पण टोयोटाने अद्याप त्यांची रेंज जाहीर केलेली नाही. त्यातील चार्जिंग प्लग टाइप-2 AC आणि CCS-2 DC चार्जरला सपोर्ट करतो.
सध्या ही कॉन्सेप्ट प्रोडक्शन टप्प्यावर पोहोचेल की नाही याची अड्याप पडताळणी कंपनीने केलेली नाही. पण असे झाले तर भारतात त्याचे लॉन्चिंग होण्याची शक्यता बळावते.
मारुती कार कोणाच्याही मागे राहणार नाही कंपनीचा दावा
मारुती दोन वर्षांत त्यांच्या 6 नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. यामध्ये, मारुती सुझुकी ई विटारा ईव्ही ही कार मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स दाखवू शकते. तसेच मारुती सुझुकीच्या गाड्या भारतात सर्वाधिक पसंत केल्या जातात. ऑटोमोबाईल क्षेत्रात जर कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये प्रवेश करत असेल, तर काही मोठ्या दमदार योजनेसह येत आहे. कंपनी 2025-2026दरम्यान ६ इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार आहे. जे इलेक्ट्रिक मार्केटमध्ये एक मोठे पाऊल ठरेल.
सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ई विटारा भारतातच तयार केली जाईल. अगामी ई विटारा जपान आणि युरोपसह जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. मारुतीच्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार ईव्ही वाहनांच्या शर्यतीत सर्वांना मागे टाकू शकते.
एका चार्जवर ई विटाराची रेंज
मारूती कंपनीची ई विटारा ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये ५०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. मारुती ई विटारा लाँच झाल्यामुळे, चार्जिंगशी संबंधित अनेक समस्या देखील दूर होतील. हे चार्जिंग पर्यायांशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी काम करेल.