AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Service | पहिल्यांदा कार सर्विसला नेताय? काय काळजी घ्याल?

Car Service | कार सर्विसला नेण्याआधी घरातून निघताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही आधीच काळजी घेतली नाही, तर तुम्हाला समस्या येऊ शकतात. ज्यामुळे तुमचाच त्रास वाढेल. काय-काय तयारी केली पाहिजे? त्या बद्दल जाणून घ्या.

Car Service | पहिल्यांदा कार सर्विसला नेताय? काय काळजी घ्याल?
Car serviceImage Credit source: Freepik
| Updated on: Nov 25, 2023 | 2:42 PM
Share

Car Service | कारला फिट अँड फाइन ठेवायच असेल, तर सर्विसिंग खूप आवश्यक आहे. सामान्यपणे गाडीची सर्विसिंग 10 हजार किलोमीटर पळाल्यानंतर करण्याचा सल्ला देण्यात येतो. Car Service मुळे दीर्घकाळ तुम्हाला कारची सेवा मिळते. त्यात बिघाड होण्याची शक्यता कमी होते. तुम्ही पहिल्यांदा कार सर्विसला नेत असाल, तर तुम्हाला काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही काय-काय काळजी घ्याल? त्या बद्दल जाणून घ्या.

तुम्ही तुमची नवीन कार पहिल्यांदा सर्विसला घेऊन जात असाल, तर घरातून निघण्यापूर्वी एक गोष्ट करावी लागेल. नव्या कारसोबत कंपनी ग्राहकांना तीन फ्री सर्विस ऑफर करते. तुम्ही सर्विस बुक सोबत घेऊन जायला विसरलात, तर अडचण येईल.

कार सर्विसला नेण्याआधी तुम्हाला घरच्या घरीच एक चेक लिस्ट बनवावी लागेल. यात कार चालवताना तुम्हाला काय समस्या जाणवतात त्या बद्दल लिहून काढा. म्हणजे सर्विस सेंटरला गेल्यानंतर एखादी गोष्ट सांगायची राहून जाणार नाही.

उदहारणार्थ कार चालवताना तुम्हाला एखादा आवाज येत असेल किंवा कुठली तार बाहेर दिसत असेल, लाइट काम करत नसेल, तर कार सर्विसला देण्याआधी सर्विस सेंटरवर काम करणाऱ्या व्यक्तीला या बद्दल सांगा.

घरातून निघताना आणि सर्विस सेंटरला पोहोचल्यानंतर कार देण्याआधी किलोमीटर जरुर चेक करा. ते नोट करुन ठेवा, कारण कार सर्विसला दिल्यानंतर ती किती चालवती गेली, हे तुम्हाला समजेल. घरातून निघण्याआधी कारमध्ये किती इंधन आहे, ते सुद्धा नोट करुन ठेवा.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत