AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा

लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा

| Updated on: Jun 24, 2026 | 5:16 PM
Share

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर नवरा आणि नवरीच्या नावासमोर जन्मतारीख लिहिणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही त्याच प्रकरणी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे.

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकरच लग्नपत्रिकेवर नवरा आणि नवरीच्या नावासमोर जन्मतारीख लिहिणे बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही त्याच प्रकरणी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे विवाहासाठी मुलगा आणि मुलगी कायदेशीर वयाचे आहेत की नाही, हे सहज समजू शकणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सादर करण्यात आली. विशेषतः परभणी जिल्ह्यात तब्बल 48% मुलींचे अल्पवयात विवाह झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कायद्याने बालविवाह गुन्हा असतानाही अनेक ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने सरकार सतर्क झाले आहे.

या नव्या नियमामुळे लग्नपत्रिका पाहताच वर-वधूचे वय स्पष्ट होणार आहे. त्यामुळे बालविवाह लपवणे कठीण होईल आणि अशा घटनांना आळा बसण्यास मदत होईल, असा दावा सरकारकडून केला जात आहे.

Published on: Jun 24, 2026 05:16 PM

Follow Us