
तुम्हाला कार खरेदी करायची आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, ही बातमी तुमच्या कामाची आहे. नवीन महिंद्रा थार 2025 येतेय आहे. एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या एसयूव्हीमध्ये डबल स्टॅक्ड स्लॅट्स, रिडिझाइन केलेले हेडलॅम्प्स आणि थोडे अद्ययावत बंपर सह नवीन ग्रिल असेल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे वाचा.
महिंद्रा अँड महिंद्रा आपल्या अत्यंत लोकप्रिय लाइफस्टाइल ऑफ-रोड एसयूव्ही थार (3-डोर) मध्ये मोठे अपग्रेड करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी हे अद्ययावत मॉडेल 2026 च्या पहिल्या सहामाहीत येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ज्यावरून आम्हाला या आगामी मॉडेलबद्दल काही माहिती मिळाली आहे. चला तर मग तुम्हाला या कारमध्ये काय मिळेल ते सांगतो.
नवीन महिंद्रा थार 2025 मध्ये थार रॉक्सचे अनेक डिझाइन घटक आणि फीचर्स असतील. एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या एसयूव्हीमध्ये डबल स्टॅक्ड स्लॅट्स, रिडिझाइन केलेले हेडलॅम्प्स आणि थोडे अद्ययावत बंपर सह नवीन ग्रिल असेल.
नवीन अलॉय व्हील्स वगळता साइड प्रोफाइलमध्ये कोणताही बदल होणार नाही. मागील बाजूस अद्ययावत थारमध्ये नवीन बंपर आणि रिडिझाइन केलेले टेल लॅम्प मिळतील. या एसयूव्ही मॉडेल लाइनअपमध्ये नवीन रंग पर्याय देखील समाविष्ट असू शकतात.
इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर यात फीचर अपग्रेड्स पाहायला मिळतील. 2025 महिंद्रा थार फेसलिफ्टमध्ये लेटेस्ट यूआय सपोर्ट, अपडेटेड डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि नवीन इलेक्ट्रिक स्टीअरिंग व्हीलसह मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळेल. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर थ्री-डोर थारमध्ये थार रॉक्सकडून व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, वायरलेस फोन चार्जर, 360 डिग्री कॅमेरा, एम्बियंट लाइटिंग मिळेल. रियर डिस्क ब्रेक आणि लेव्हल-2 एडीएएस सूट मिळू शकतो.
नवीन महिंद्रा थार 2025 मध्ये 2.0 लीटर टर्बो पेट्रोल, 1.5 लीटर टर्बो डिझेल आणि 2.2 लीटर टर्बो डिझेल इंजिन असेल. पेट्रोल इंजिन 152 बीएचपीची अधिकतम पॉवर जनरेट करते, तर 1.5 लीटर आणि 2.2 लीटर डिझेल इंजिन 119 बीएचपी आणि 130 बीएचपीचे पॉवर जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक युनिट चा पर्याय असेल. आरडब्ल्यूडी (रियर व्हील ड्राइव्ह) आणि 4डब्ल्यूडी (फोर-व्हील ड्राइव्ह) दोन्ही प्रणाली उपलब्ध असतील.