Nissan Magnite | निसानच्या ‘या’ गाडीसाठी शोरुमध्ये गर्दी, वेटिंग पिरियड दोन महिन्यांवर

| Updated on: Dec 11, 2020 | 12:52 PM

शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे.

Nissan Magnite | निसानच्या या गाडीसाठी शोरुमध्ये गर्दी, वेटिंग पिरियड दोन महिन्यांवर
Follow us on

मुंबई : निसान मॅग्नाईट या गाडीने पहिल्या पाच दिवसांमध्ये तब्बल 5 हजार बूकिंग मिळवल्या आहेत (Nissan Magnite Sale). ही गाडी 2 डिसेंबरला लॉन्ट झाली. मात्र, ग्राहकांमध्ये आता या गाडीची क्रेझ खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेन्टमध्ये ही गाडी कमाल करु शकते. सध्या या गाडीचा वेटिंग पिरिअड हा दोन महिन्यांपर्यंत पोहोचला आहे (Nissan Magnite Sale).

शोरुममध्ये या गाडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दररोज लोक या गाडीला पाहायला आणि तिचे फिचर्स जाणून घेण्यासाठी शोरुममध्ये गर्दी करत आहे. त्यामुळे या गाडीचा वेटिंग पिरिअड सध्या दोन महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती दिल्लीच्या काही डिलर्सने दिली आहे.

टॉप व्हेरिअंटला ग्राहकांची पसंती

ग्राहक जास्तकरुन टॉप व्हेरिअंटमध्ये आपला इंटरेस्ट दाखवत आहेत. मॅग्नाईटची सुरुवातीची किंमत ही 4.99 लाख रुपये आहे. कार निर्मातांच्या मते या गाडीच्या टॉप व्हेरिअंटसाठी जवळपास 60 टक्के लोकांनी बूकिंग केली आहे. तर 40 टक्के ग्राहकांनी ही गाडी ऑनलाईन बूक केली आहे, अशी माहिती कंपनीने दिली (Nissan Magnite Sale).

निसान मॅग्नाईटचे फिचर्स

निसान मॅग्नाईटमध्ये अनेक सर्वोत्तम फिचर्स आहेत. ज्यामध्ये टर्बो इंजिन, CVT ट्रांसमिशन ऑप्शन आणि ड्युअल टोन यांचा समावेश आहे. निसान मॅग्नाईट 1.0 लिटर B4D पेट्रोल MT संस्करणमध्ये XV ग्रेडसोबत 38,698 रुपयांच्या किमतीत टेक पॅक ऑफर करत आहे. या व्हेरिअंट आणि इंजिन पर्यायाची किंमत 6.68 लाखापासून सुरु होते. टेक पॅकमध्ये एअर प्युरिफायर, पॅडल लॅम्प, एबियंट लाईट, वायरलेस कार चार्जिंग, प्रीमियम स्पिकर्स यासारखे फिचर्स आहेत.

Nissan Magnite Sale

संबंधित बातम्या :

‘या’ आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या KTM च्या ‘या’ बाईकचं पुढील व्हर्जन लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Alert! तुमच्या गाडीवर त्वरित हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावून घ्या, अन्यथा ‘ही’ कामे करता येणार नाहीत

टाटा मोटर्सच्या गाड्यांवर ‘एवढ्या’ हजारांची सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर