धूर नाही, पाणी सोडते ही कार, हायड्रोजन कारने नितीन गडकरी संसदेत, पाहा Photos

| Updated on: Mar 30, 2022 | 3:17 PM

ग्रीन हायड्रोजन इंधनावर (Green Hydrogen Fuel) चालणाऱ्या कारमधून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज संसदेत पोहोचले. टोयोटा मिराई (2022 Toyota Mirai) असे या कारचे नाव आहे. टोयोटाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली असून त्यात अत्याधुनिक इंधन सेल यंत्रणा (अॅडव्हान्स फ्यूल सिस्टिम) बसवली आहे.

1 / 5
ग्रीन हायड्रोजन इंधनावर (Green Hydrogen Fuel) चालणाऱ्या कारमधून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज संसदेत पोहोचले. टोयोटा मिराई (2022 Toyota Mirai) असे या कारचे नाव आहे. टोयोटाने पायलट प्रोजेक्ट अंतर्गत ही कार तयार केली असून त्यात अत्याधुनिक इंधन सेल यंत्रणा (अॅडव्हान्स फ्यूल सिस्टिम) बसवली आहे. ही सिस्टम सेल ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे मिश्रण करून एका विशेष प्रक्रियेद्वारे वीज निर्माण करते. या विजेच्या साहाय्याने गाडी धावते.

2 / 5
टोयोटाने नुकतीच आपली हायड्रोजन कार टोयोटा मिराई भारतीय ऑटोमोबाईल बाजारात लॉन्च केली आहे. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीतच ही कार सादर करण्यात आली. गडकरींनी ही कार आपलं भविष्य आहेस, असं वर्णन केलं असून जपानी भाषेत मिराई या शब्दाचा अर्थ भविष्य असा होतो.

3 / 5
या कारबाबत बोलताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ही कार पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. तसेच या कारमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. ते पुढे म्हणाले की ही कार भारताचं भविष्य आहे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतात हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु हायड्रोफ्यूल कारमुळे प्रदूषण होत नाही.

4 / 5
टोयोटा मिराईमध्ये विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. यात हायड्रोजन फ्यूल टँक आहे. यामधून हायड्रोजन बाहेर येऊन फ्यूल सेलमध्ये जातो. ऑक्सिजनच्या मदतीने रासायनिक अभिक्रिया (केमिकल रिअॅक्शन) केली जाते, त्यानंतर वीज तयार होते. हायड्रोजन फ्युएल सेलच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या विजेमुळे यामधील मोटारीला पॉवर मिळते आणि मिराई कार पुढे सरकते. त्यानंतर ही कार धूर नाही तर पाणी सोडते (उत्सर्जित करते).

5 / 5
हायड्रोजन फ्यूल कारच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे तर, यामध्ये इंधन भरणं सोपं आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रमाणे हे फ्यूल देखील 2-3 मिनिटात भरले जाऊ शकते. हायड्रोजन पॉवर कारमधील प्रेशर टँकमध्ये हायड्रोजन साठवता येतं. त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी फ्यूल सेलमध्ये हस्तांतरित केले जाते.