AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Brezza फेसलिफ्ट खरेदी करायचीय, किती हवा पगार, Down Payment आणि EMI हप्ता पाहा…

जर तुम्ही नवीन कोरी 2026 Maruti Brezza खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कारची केवळ एक्स शोरूम किंमत जाणून उपयोगी नाही. या कारला लोनवर खरेदी करण्यासाठी तुमचा पगार नेमका किती असायला हवा याची माहिती घेणे गरजेचा आहे. या कारचे नवीन फिचर्स, सेफ्टी, इंजिन आणि मायलेजची संपूर्ण माहिती एका क्लिकवर जाणून घ्या......

Maruti Brezza फेसलिफ्ट खरेदी करायचीय, किती हवा पगार, Down Payment आणि EMI हप्ता पाहा...
2026 Maruti Brezza
| Updated on: Aug 01, 2026 | 5:32 PM
Share

2026 Maruti Brezza ने भारतीय बाजारात नव्या अवतारात एंट्री मारली आहे. कंपनीने या अपडेटेड सुव्हची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत 7,39,900 रुपये ठेवली आहे. या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 11,65,500 रुपयांपर्यंत जाते. बाजारात मारुती ब्रिझाची स्पर्धा Tata Nexon सारख्या सुव्हशी होत आहे.

जर तुम्ही Maruti Brezza सुव्हच्या नव्या अवताराला खरेदी करु इच्छीत असाल तर हा लेख तुम्हाला फायद्याचा आहे. या लेखात आपण या सुव्हची ऑन रोड प्राईज आणि ईएमआयची माहिती घेणार आहोत. याशिवाय नव्या Brezza च्या इंटेरिअर, फिचर्स, सेफ्टी, इंजिन आणि मायलेज संदर्भात माहिती घेणार आहोत.

Maruti Brezza On Road Price

नव्या ब्रेझा फेसलिफ्टला भारतीय बाजारात 7,39,900 सुरुवाती एक्स शोरुम किंमतीत लाँच केले आहे. राजधानी दिल्लीत या कारला खरेदी केल्यानंतर आरटीओला 59,192 रुपयांचे शुल्क भरावे लागते. याशिवाय 3,101 रुपये कारच्या विम्याचे भरावे लागतात. यामुळे या कारची दिल्लीत ऑन रोड किंमत 8,32,193 रुपये होणार आहे.

जर तुम्ही नवी कोरी मारुती ब्रेझा खरेदी करताना 2 लाख रुपये Down Payment देत असाल तर उरलेले 6,32,193 रुपये तुम्हाला कार लोन घ्यावे लागेल. जर तुमची मासिक कमाई चांगली असेल आणि Credit Score चांगला असेल तुम्हाला 10 टक्के व्याजाच्या दराने सहज कर्ज मिळेल.

जर हे Car Loan तुम्हाला पाच वर्षांसाठी घेतले तर या प्रकारे 10 टक्के व्याजदराने 13,432 रुपयांचे एकूण 60 EMI भरुन तुमचे कार लोन चुकते करु शकता. याप्रकारे तुम्ही एकूण कारचा 8,05,934 रुपयांचा हप्ते भराल. जर दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंटयास जोडले तर या कारची किंमत 10,05,934 रुपये ( व्याज आणि ईएमआय नंतर ) होऊन जाईल.

डिझाईन आणि इंटेरिअर

2026 मारुती ब्रेझा फेसलिफ्ट बोल्ड फ्रंट ग्रिल (स्मोक क्रोम),नवीन बंपर, सिल्व्हर स्किड प्लेट आणि अपडेटेड अलॉय व्हील्स मिळतात. या कारचा प्रोफाईल बॉक्सी आणि मस्क्युलर आहे. इंटेरिअरमध्ये ड्युअल – टोन ब्लॅक- ब्राऊन धीम, ग्लॉस ब्लॅक ट्रिम्स, लेदरेट अपहोल्स्ट्री, 64-कलर एम्बिएंट लायटिंग, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 10.1-इंच स्मार्टप्ले प्रो X टचस्क्रीन (वायरलेस Android Auto/Apple CarPlay) आहे. एअर प्युरिफायर, कुल्ड वायरलेस चार्जर आणि सनरुफ देखील उपलब्ध आहे.

फिचर्समध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल, 360° कॅमरा, ARKAMYS साऊंड सिस्टम आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. सेफ्टीसाठी यात सहा एअर बॅग, ESC, HHA स्टँडर्ड. TPMS, फ्रंट पार्किंग सेंसर, ब्लाईंड स्पॉट वार्निंग, रिअर क्रॉस ट्रैफिक अलर्ट आणि 5-स्टार भारत NCAP रेटिंग मिळालेली आहे.

इंजिन आणि मायलेज

1.0L टर्बो (110 PS/170 Nm, 6MT): 19.96-20.47 KMPL

1.5L पेट्रोल माईल्ड हायब्रिड (103 PS/139 Nm, 6MT/AT): 20.17-21.09 KMPL

1.5L CNG (88 PS, 6MT, अंडरबॉडी टँक): 26.90 KM/KG

आमचा सल्ला –

ही दिलेली माहिती Maruti Brezzaच्या ऑन रोड प्राईज आणि ईएमआय संबंधी डिटेल्स केवळ उदाहरण म्हणून दिलेले आहे. शहर,डिलरशिप,कारचे मॉडेल, विमा कंपनी, आणि व्याजाचा दर कमी जास्त झाल्यास हा अंदाज बदलू शकतो. जर तुम्हाला महिन्याला 50 ते 60 हजार कमावत असाल तर आणि तुमच्यावर अन्य दुसरे कोणतेही मोठे लोन नसेल तर नवीन ब्रेझा कार लोनवर घेऊ शकता.

Follow Us
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा
धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; ठाकरेंचा मोठा दावा
मोठी बातमी! धनुष्यबाण आमचाच... नाही मिळालं तर गोठवलं जाईल; सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर...
CJP सह अनेक संस्थांचं टेन्शन वाढलं; विदेशी फंडिंगच्या दाव्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे थेट आदेश...