TATA चा जोरदार धमाका, लाँच केली हटके कार; किंमत फक्त…

TATA ने जोरदार धमाका केला आहे. टाटा एरिस कार लाँच केली आहे. कारमध्ये सीएनजी आणि पेट्रोल असे दोन्ही व्हेरिएन्ट आहेत.

TATA चा जोरदार धमाका, लाँच केली हटके कार; किंमत फक्त...
Tata car
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 1:38 PM

टाटाने एरिस (TATA Aeris) कार लाँच केली आहे. लाँच केलेल्या कारची स्पर्धा ही मारुती सुझुकी डिझायर, ह्युंदई ऑरा आणि होंडा अमेझ या कारशी होणार आहे. टाटा ही कार पर्सनल कार म्हणून सादर करण्यात येत आहे. मारुती सुझुकी डिझायरच्या विक्रीत मोठा वाटा हा कॅब आणि टॅक्सी चालकांचा असतो. परंतु झिझायर ही सर्वाधिक विक्री केली जाणारी कार आहे.

टाटाने एरिसा कार ही टिगोरच्या जागी लाँच केली आहे. नव्याने लाँच करण्यात आलेल्या कारमध्ये नवीन डिझाइन मिळत आहे. तसेच सेफ्टी आणि इतर फिचर देखील देण्यात आले आहेत. कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग आणि इतर फिचर्स देखील मिळतात. टाटाने ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. कारमध्ये ड्युअल सीएनजी सिलिंडर देखील आहे. या कारचं इंटीरियर टाटा टियागो सारखं आहे. यात डिजिटल इस्ट्रूमेंट क्लस्टरसहित 10.25 इंच इन्फोटेन्मेंट सिस्टीम देखील देण्यात आली आहे. या कारमध्ये इन-बिल्ट डॅशकॅम, 6 एअरबॅग, 360 डिग्री कॅमेरा, लेदर सीट्स आणि व्हेंटिलेटेड सीट्स सारखे फिचर्स देखील देण्यात आले आहेत.

एसी सहित अनेक कंट्रोलसाठी बट्न्सची सुविधा देखील आहे. कारने सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिलं आहे. ही कार सीएनजीसहित एएमटीसोबत मिळते. कंपनीने सुरक्षितता देखील प्रत्यक्षात दाखवली आहे. यावेळी ट्रकवरून ढिगारा कारवर पाडण्यात आला. ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर कार पुन्हा बाहेर काढण्यात आली. त्यानंतरही कार आरामात सुरू झाली. प्रयोगासाठी सीएनजी कारचा वापर करण्यात आला. कारमध्ये डीव्हीआर, एसव्हीएस, टीपीएमएस , ब्लाइंड व्यू मॉनिटरिंग, रोल ओवर मिटिगेटिंगस. हिल होल्ड कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोल, 6 एअरबॅग स्टँडर्ड, पोस्ट क्रॅश एसओएस सपोर्ट आणि पोस्ट क्रॅश पॅनिक नोटिफिकेशन सारखे सेफ्टी फिचर्स मिळतात.

इंजिन आणि पॉवर

कारमध्ये 86 पीएस पॉवर आणि 113 एनएम टॉर्क असलेले पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. तर सीएनजी कारमध्ये 75.5 पीएस पॉवर आणि 96.5 एनएम टॉर्क निर्माण करते. टाटा एरिस ही कार सीएनजीवर सुरू होऊ शकते. या कारमध्ये पेट्रोलसाठी 70 लिटर टँक मिळतो. तसेच कारमध्ये 170 एमएम टा ग्राउंड क्लियरन्स देखील मिळतो. या कारची किंमत ही 5.29 लाख (एक्स शोरूम) रुपयांपासून सुरू होते. तर सीएनजी व्हेरिएन्टची किंमत 6.29 लाख रुपयांनी ( एक्स शोरूम ) सुरू होते. पेट्रोल टॉप व्हेरिएन्ट कारची किंमत 8.19 लाख रुपये इतकी आहे. टॉप सीएनजी व्हेरिएन्टची किंमत 9.19 लाख रुपये इतकी आहे. कारची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. या कारची डिलिव्हरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मिळेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us