AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर तारीख ठरली… अभिजीत दीपके संतापले, ज्ञानेश कुमार यांना घाम फोडणारी घोषणा; थेट मुंबईतच…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एसआयआर प्रकरणावरून संताप व्यक्त होत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी थेट मुंबईत 2 ऑक्टोबरपासून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह, एसआयआरवर बंदी आणि 2023 चा कायदा रद्द करण्याच्या मागण्या केल्या आहेत.

अखेर तारीख ठरली... अभिजीत दीपके संतापले, ज्ञानेश कुमार यांना घाम फोडणारी घोषणा; थेट मुंबईतच...
gyanesh kumarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 25, 2026 | 1:39 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. ज्ञानेश कुमार यांनी एसआयआरच्या नावाखाली देशाची फसवणूक केल्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता या वादात कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी उडी घेतली आहे. दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांचं टेन्शन वाढवणारं विधान केलं आहे. दीपके यांनी थेट आंदोलनाची घोषणाच केली आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अभिजीत दीपके यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही तर, सीजेपी 2 ऑक्टोबरपासून मुंबईत देशव्यापी आंदोलन छेडणार आहे. हे आंदोलन फक्त मुंबईपर्यंत मर्यादित राहणार नाही. तर देशाच्या अनेक शहरांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. गांधी जयंतीच्या दिवशीच आम्ही आंदोलन करणार असून देशाची लोकशाही वाचवण्याचा संकल्प करणार आहोत, असं अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

काल दिलेला अल्टिमेटम

अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी या तिघांनीही ज्ञानेश कुमार यांना 48 तासाचा अल्टिमेटम दिला होता. आम्ही तीन मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई व्हावी. दुसरी म्हणजे, एसआयआरवर बंदी घालण्यात यावी आणि जानेवारी 2025 ची व्होटर लिस्ट कायम करण्यात यावी. तिसरं म्हणजे, 2023 चा कायदा रद्द करण्यात यावा आणि निवडणूक आयोगात सुधारणा घडवून आणल्या जाव्यात, असं दीपके यांनी म्हटलं होतं.

नीट पेपरच्या विरोधात दिल्लीत आंदोलन केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे दीपके यांच्या या इशाऱ्याकडे गांभीर्याने घेतलं जात आहे. दीपके यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने ज्ञानेश कुमार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

खुलाश्याने खळबळ

बुधवारी इंडियन एक्सप्रेसमध्ये निवडणूक आयोग आणि एसआयआरबाबत एक बातमी आली होती. त्यामुळे देशात खळबळ उडाली होती. एसआयआर प्रक्रियेच्यावेळी तीन पैकी दोन निवडणूक आयुक्तांनी अनेकदा त्याला आक्षेप घेतला होता. मात्र, तरीही ज्ञानेश कुमार यांनी बहुमत डावलून परस्पर निर्णय घेतले होते. ही बातमी येताच देशात एकच खळबळ उडाली आहे.

विरोधी पक्षांनी यापूर्वीच एसआयआरच्या प्रक्रियेवर सवाल उपस्थित केले आहेत. पण नव्या दाव्याने आता विरोधकांच्या हातात मोठा मुद्दा आला आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टी, डीएमके, मनसे, टीएमसी, उबाठा आणि इतर पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वत: दखल घेण्याची मागणीही विरोधक करत आहेत.

दरम्यान, काँग्रेस आज ज्ञानेश कुमार यांच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मार्च काढणार आहे. गुरुवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयुक्तांवर निशाणा साधला होता. तसेच विरोधकांनी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची तयारीही सुरू केली आहे.

Follow Us
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप