Disha Salian : दिशा सालियानप्रकरणी सूरज पांचोलीचं नाव येताय एक्स गर्लफ्रेंडच्या आईचं मोठं वक्तव्य
Disha Salian : दिशा सालियान प्रकरणी अभिनेता सूरज पांचोली यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, जे आरोप सूरज याने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. यावर आता सूरज याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या आईने मोठं वक्तव्य केलं आहे.

Disha Salian : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणी तपासासाठी सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर अभिनेता सूरज पंचोली याच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. सूरज याच्यावर दिशाच्या मृत्य प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पण हे आरोप अभिनेत्याने पूर्णपणे फेटाळले आहे. ‘मी दिशाला ओळखत नाही आणि कधी तिला भेटलो देखील. एवढंच नाही तर, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही…’, असं सूरज म्हणाला. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा कोणत्या महिलेच्या हत्येत सुरज याचं नाव समोर आलं आहे. याआधी एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री जिया खान हिच्या हत्या प्रकरणात देखील सूरज याचं नाव समोर आलं होतं. यामध्ये अभिनेत्याची निर्दोष मुक्तता झाली. यावर आता जिया खान हिच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट शेअर करत जिया खान हिची आई म्हणाली, ‘जेव्हा मला कळलं की, दिशा सालियान प्रकरणी, त्याच व्यक्तीचं नाव समोर आलं, तेव्हा मला फार दुःख झालं. ही गोष्ट प्रत्येकासाठी चिंतेचा विषय असली पाहिजे… जिया हिच्या प्रकरणात काय झालं, ते मला सर्वकाही माहिती आहे. जे फार महत्त्वपूर्ण आहे, ते म्हणजे सर्व पुरावे नष्ट केलं जातात आणि त्यामध्ये मोठे बदल करण्यात येतात. अशा वेळी पीडितेसोबत नेमकं काय झालं आहे, याचा शोध घेणं फार कठीण होतं… एकदा पुरावे नष्ट झाले की, सत्यापर्यंत पोहोचणं फार कठीण होतं…’
‘त्याचीच पुनरावृत्ती होत आहे…’
जियाच्या आई पुढे म्हणतात, ‘हायकोर्टाने दिशा सालियन मृत्यू प्रकरणातील तपासात अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. जेव्हा महत्त्वपूर्ण पुरावे आधीच नष्ट झाले असतात किंवा गहाळ झालेले असतात, तेव्हा नवीन तपास सुरू करण्यासमोर मोठं आव्हान उभं राहतं. मला असं वाटतं की, जियाच्या प्रकरणात दिसून आलेली तीच परिस्थिती दिशाच्या प्रकरणातही पुन्हा उद्भवत आहे. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायाच्या मार्गात अडथळे येत आहेत. जियाच्या प्रकरणात ज्या पद्धतीचा अवलंब केला गेला होता, तीच पद्धत येथेही वापरली जात आहे.
पीडित कुटुंबला सत्य कळलंच पाहिजे…
‘तपास अधिकाऱ्यांनी महत्त्वाचे पुरुवे सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे आणि तपास केला पाहिजे… ते नष्ट होऊ दिले जाऊ नये; अन्यथा, भविष्यातील तपासातही सत्य उघड होणार नाही. त्यांनी असं नमूद केलं की, जियाप्रमाणेच दिशालाही सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे…’, असं देखील दिशाच्या आई म्हणाल्या.
