टाटा मोटर्सची नवी SUV Punch सादर, अल्ट्रॉजच्या प्लॅटफॉर्मवर सुसज्ज कारचं लाँचिंग कधी?

| Updated on: Aug 23, 2021 | 5:58 PM

टाटा मोटर्सने त्यांची एसयूव्ही 'पंच' (SUV Punch) सादर केली आहे. ही तीच SUV आहे जिला HBX म्हटले जात होते.

टाटा मोटर्सची नवी SUV Punch सादर, अल्ट्रॉजच्या प्लॅटफॉर्मवर सुसज्ज कारचं लाँचिंग कधी?
Follow us on

मुंबई : टाटा मोटर्सने त्यांची एसयूव्ही ‘पंच’ (SUV Punch) सादर केली आहे. ही तीच SUV आहे जिला HBX म्हटले जात होते. पण कंपनीने या कारचे नाव पंच असे बदलले आहे. भारतीय ऑटो कंपनी टाटा मोटर्सने सोमवारी सांगितले की, ते सणासुदीच्या काळात आपली मिनी एसयूव्ही पंच लॉन्च करेल. पंच एसयूव्ही H2X कॉन्सेप्टवर आधारित आहे, जी टाटा मोटर्सने ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर केली होती. (Tata Motors new SUV Punch will launch on Diwali 2021, know more)

ही कार कंपनीच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही नेक्सॉनअंतर्गत असेल आणि या वर्षी दिवाळीच्या आसपास बाजारात येण्याची शक्यता आहे. “सणासुदीच्या काळात ही कार नॅशनल लाँचिंगसाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, स्पोर्टिंग डायनॅमिक्ससह टफ यूटिलिटीचं मिश्रण या कारमध्ये पाहायला मिळेल.

तथापि, कंपनीने येथे वाहनाबद्दल फारशी माहिती सादर केलेली नाही. टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेइकल बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले की, “टाटा पंच, हे नावाप्रमाणेच, एक एनरजेटिक व्हीकल आहे ज्यामध्ये कुठेही जाण्याची क्षमता आहे.

ते पुढे म्हणाले की, ही कार ग्राहकांच्या गरजा पूर्ण करेल. कॉम्पॅक्ट सिटी कारमध्ये एसयूव्ही फीचर्स शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार बनवण्यात आली आहे. पंच आमच्या एसयूव्ही फॅमिलीमधील चौथे वाहन आहे. अशा परिस्थितीत, आता आम्ही रेंज ऑप्शन वाढवण्याचा विचार करीत आहोत.

दमदार इंजिन

ALFA-ARC (Agile Light Flexible Advanced Architecture) प्लॅटफॉर्मवर बांधली जाणारी ही पहिली SUV आहे, जी इम्पॅक्ट 2.0 डिझाइन लँग्वेजअंतर्गत विकसित केली गेली आहे. टाटा टिगॉर, अल्ट्रॉझ आणि अगदी टियागोलाही पॉवर देणारं 1.2-लीटर पेट्रोल इंजिन यात दिलं जाण्याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्स कंपनी येथे टर्बो चार्ज 1.2-लीटर इंजिन पर्याय देखील देऊ शकते.

इग्निस आणि कॅस्परला टक्कर

गेल्या वर्षी ऑटो एक्स्पो दरम्यान टाटा मोटर्सने पंचला HBX कॉन्सेप्ट मायक्रो-एसयूव्ही म्हणून पहिल्यांदा प्रदर्शित केली. पंच एसयूव्ही मारुती सुझुकी इग्निस आणि आगामी ह्युंडई मायक्रो-एसयूव्हीला टक्कर देईल, या कारला कॅस्पर म्हटले जाण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या

अवघ्या 25 हजारात खरेदी करा जबरदस्त मायलेज देणारी बाईक, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

अवघ्या 92 हजारात घरी न्या Maruti ची 31 KM मायलेज देणारी कार, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

महिंद्रा कडून Bolero Neo N10 (O) ची किंमत जाहीर, जाणून घ्या टॉप मॉडेलमध्ये काय आहे खास

(Tata Motors new SUV Punch will launch on Diwali 2021, know more)