Zomato ची मोठी घोषणा; 2030 पर्यंत डिलिव्हरीसाठी 100 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर

झोमॅटो आणि जियो-बीपी यांच्या दरम्यान झालेल्या कराराअंतर्गत 2030 पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिक डिलिव्हरी वाहनांचे लक्ष ठरविण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ठरविण्यात आलेल्या वेळेपर्यंत लक्ष साध्या करण्यासाठी सर्व टेक्निकल बाबी पूर्ण करण्यात आल्या असून त्यासाठी संपूर्ण क्षमता पणाला लावून प्रयत्न केले जाणार आहे.

Zomato ची मोठी घोषणा; 2030 पर्यंत डिलिव्हरीसाठी 100 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
2030 पर्यंत डिलिव्हरीसाठी 100 टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा वापर
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 5:37 PM

जियो-बीपी (Jio-BP) आणि झोमॅटोमध्ये (Zomato) बुधवारी एक मोठी डील फायनल झाली असून या करारानुसार, आता झोमॅटोच्या इलेक्ट्रिक वाहनांना मोबिलिटी सेवा देण्याची जबाबदारी जियो-बीपी यांची असणार आहे. या शिवाय जियो-बीपी पल्स ब्रँडेड बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचा फायदा देखील झोमॅटोच्या इलेक्ट्रिक वाहनांना (Electric vehicles) मिळवता येणार आहे. याच्या माध्यमातून केवळ पर्यावरणाचे रक्षणच नव्हे तर, इलेक्ट्रिक वाहनांबाबत जागृकताही निर्माण होणार असल्याचा विश्‍वास झोमॅटो तसेच जियो-बीपी यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे.

डिलिव्हरी शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहनांचे लक्ष्य

झोमॅटो आणि जियो-बीपी यांच्या दरम्यान झालेल्या कराराअंतर्गत 2030 पर्यंत 100 टक्के इलेक्ट्रिक डिलिव्हरी वाहनांचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ठरविण्यात आलेल्या वेळेपर्यंत लक्ष साध्या करण्यासाठी सर्व टेक्निकल बाबी पूर्ण करण्यात आल्या असून त्यासाठी संपूर्ण क्षमता पणाला लावून प्रयत्न केले जाणार आहे.

इको सिस्टीम तयार होणार

रिलायंस आणि बीपीच्या क्षमतेचा लाभ घेताना, जियो-बीपी एक वेगळ्या पध्दतीची इको सिस्टीम तयार करणार आहेत. ज्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या व्हॅल्यू चेनमध्ये सर्वच हितधारकांना याचा फायदा होण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी जियो बीपीने भारतामध्ये दोन सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग हब्स लाँच केले आहेत.

असे मिळणार चार्जिंग स्टेशन

भारतीय ग्राहकांना चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर उपलब्ध करुन देणार्या कंपनीचा इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस जियो-बीपी पल्स ब्रांडअंतर्गत सुरु होत आहे. जियो-बीपी पल्स एक मोबाइल ॲप देखील आहे, ज्याच्या मदतीने ग्राहक सहज पध्दतीने चार्जिंग स्टेशनची माहिती जाणून घेउ शकतात. हाय परफॉर्मेंस बॅटरी, वाहनामध्ये उत्तम दर्जाची ऑन रोड रेंज आणि काही मिनिटांमध्येच बॅटरी स्वॅपिंगची सुविधा असल्यामुळे दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी हा एक चांगला पर्याय मानला जात आहे. विशेषत: डिलिव्हरी सेगमेंटच्या गाड्यांना याचा चांगला फायदा होणार आहे.