Altroz ते DZire, 2021 मध्ये भारतीयांनी या 5 कार गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या

| Updated on: Dec 25, 2021 | 3:43 PM

मारुती सुझुकी डिझायर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान आहे. त्यामुळे, 2021 मध्ये DZire ही Google वर सर्वाधिक सर्च केली गेलेली कार आहे. दर महिन्याला सरासरी 4.5 लाख लोकांनी ही कार गुगलरवर सर्च केली आहे.

1 / 5
मारुती सुझुकी डिझायर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी सेडान आहे. त्यामुळे, 2021 मध्ये DZire ही Google वर सर्वाधिक सर्च केली गेलेली कार आहे. दर महिन्याला सरासरी 4.5 लाख लोकांनी ही कार गुगलरवर सर्च केली आहे. ही कार मॅन्युअल आणि AMT दोन्ही पर्यायांसह 1.2 लीटर पेट्रोल इंजिनसह येते.

2 / 5
Tata Altroz ​​ही भारतीय ऑटो कंपनी टाटाच्या सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे आणि या कारने प्रिमियम हॅचबॅक स्पेसमध्ये स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. 2021 मध्ये गुगलवर सर्वाधिक शोधली जाणारी ही दुसरी कार होती. ग्लोबल NCAP कडून 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालेली ही देशातील लोकप्रिय कार आहे.

3 / 5
होंडा सिटी ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेडानपैकी एक आहे. दर महिन्याला सरासरी 3.6 लाख लोकांनी ही कार गुगलरवर सर्च केली आहे. होंडा सिटी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शन्समध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह ऑफर केली जाते.

4 / 5
टाटाचे आणखी एक उत्पादन जे टॉप 5 सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या कारच्या यादीत आहे, ती कार म्हणजे टाटा टियागो हॅचबॅक. गुगल सर्चच्या बाबतीत टियागो चौथ्या स्थानावर आहे. ही एंट्री-लेव्हल कार कंपनीच्या लाइन-अपमध्ये सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. छोट्या कार्सच्या सेगमेंटमधील ही लोकप्रिय कार आहे. Tiago या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे.

5 / 5
मारुती सुझुकी अल्टो ही गुगल सर्चच्या बाबतीत पाचवी सर्वात लोकप्रिय कार आहे. दर महिन्याला सरासरी 3 लाखांहून अधिक लोकांनी ही कार गुगलरवर सर्च केली आहे. अल्टो दोन दशकांहून अधिक काळ बाजारात आहे आणि ही कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार्सपैकी एक आहे. मारुती सुझुकी इंडिया 2022 मध्ये नवीन-जनरेशन अल्टो लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.