ट्रायम्फची नवी बाईक आली! जगभरात फक्त 1000 लोकांना मिळणार, किंमत किती वाचा

ट्रायम्फने नुकताच Triumph Street Triple 798 Moto2 Edition ही नवी बाईक लाँच केली आहे. या बाईकला शक्तिशाली इंजिन, सुधारित सस्पेंशन आणि नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. ही बाईत जगभरातील केवळ 1000 लोकांना खरेदी करता येणार आहे.

ट्रायम्फची नवी बाईक आली! जगभरात फक्त 1000 लोकांना मिळणार, किंमत किती वाचा
Triumph Street Triple 798 Moto2 Edition
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 29, 2026 | 1:27 PM

जर तुम्हाला रेसिंग ट्रॅकसारखा अनुभव देणारी दमदार सुपरबाइक्स आवडत असतील, तर ट्रायम्फची नवीन ऑफर तुमचं मन जिंकू शकते. ब्रिटिश टू-व्हीलर कंपनी ट्रायम्फने जगभरातील बाईक प्रेमींना मोठी भेट देत त्यांची नवीन सुपरबाइक Triumph Street Triple 798 Moto2 Edition लाँच केली आहे. व्हॅलेन्सिया मोटोजीपीत लाँच झालेली ही सुपरबाइक कंपनीच्या स्टँडर्ड मॉडेलचं अधिक दमदार आणि ट्रॅक-फोकस्ड रूप आहे. खास गोष्ट म्हणजे या बाईकचे फक्त १,००० युनिट्स विकले जाणार आहेत. म्हणजे ती सर्वांसाठी उपलब्ध नाही. चला, या सुपरबाइकचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया…

Triumph Street Triple 798 Moto2 Edition लाँच झाली आहे. ही सुपरबाइक कंपनीने बाजारात Valencia MotoGP ही बाईक लाँच झाल्यानंतर आणली आहे. ही बाईक विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना स्ट्रीट रायडिंगसोबत ट्रॅकवरही बाईक चालवणं आवडतं. नवीन Moto2 Edition कंपनीने Street Triple 798 RS च्या आधारे तयार केली आहे, पण इंजिनपासून सस्पेंशन आणि डिझाईनपर्यंत अनेक मोठे बदल दिसून येतात.

Loading...

Street Triple 798 Moto2 Editionमध्ये ट्रायम्फने ७९८ सीसीचं तीन सिलिंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन १३३ बीएचपीची पॉवर आणि ८६ एनएम टॉर्क निर्माण करतं. जुन्या Moto2 Editionमध्ये ७६५ सीसीचं इंजिन होतं, जे १२८ बीएचपी पॉवर आणि ८० एनएम टॉर्क देत होतं. म्हणजे नवीन बाईकमध्ये पॉवर आणि टॉर्क वाढवण्यात आले आहेत. यासोबत ट्रायम्फचा दावा आहे की नवीन इंजिनात संपूर्ण आरपीएम रेंजमध्ये सुमारे १० टक्के अधिक टॉर्क मिळेल.

सस्पेंशन आणि ब्रेकिंगमध्येही बदल

ट्रायम्फच्या या सुपरबाइकमध्ये ४३ मिमीचे पूर्णपणे ऍडजस्टेबल Ohlins NIX30 अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स दिले आहेत. मागे Ohlins STX46 शॉक ऍब्झॉर्बरही आहे. ब्रेकिंगसाठी Brembo Hypure चे ४ पिस्टन कॅलिपर्स आणि ३१० मिमीचे ड्युअल फ्लोटिंग डिस्क आहेत. क्लिप-ऑन हँडलबार आणि रीअरसेट फुटपेग्सही मिळतात. या बदलांमुळे रायडरला अधिक स्पोर्टी रायडिंग पोझिशन मिळते.

आधीपेक्षा हलकी आहे बाईक

Triumph Street Triple 798 Moto2 Editionचं वजन १८१ किलोग्रॅम आहे. हे ७९८ आरएसपेक्षा २ किलोग्रॅम आणि जुन्या Moto2 Editionपेक्षा ७ किलोने कमी आहे. वजन कमी ठेवण्यासाठी लिथियम आयॉन बॅटरी आणि कार्बन फायबरचे अनेक भाग वापरले आहेत. यात हेडलाइट सराउंड, फ्रंट मडगार्ड, हील गार्ड आणि बेली पॅन समाविष्ट आहेत.

फीचर्स आणि डिझाईनही खास

या सुपरबाइकमध्ये ७ इंचाचा टचस्क्रीन टीएफटी डिस्प्ले आहे. तसेच ऍपल कारप्ले आणि ॲन्ड्रॉइड ऑटोचा वायरलेस सपोर्ट आहे. क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग लाइट्स आणि इमर्जन्सी डिसिलरेशन वॉर्निंग सिस्टमसारखे ॲडव्हान्स फीचर्सही आहेत. रायडिंगसाठी सात मोड्स आहेत – इको, रेन, रोड, स्पोर्ट, ट्रॅक आणि दोन कस्टम रायडर मोड्स. लॉन्च कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल आणि क्विकशिफ्टरही मिळतात.

किती आहे किंमत?

Triumph Street Triple 798 Moto2 Editionची किंमत १५,५२५ पाउंड ठेवण्यात आली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत सुमारे १८.९० लाख रुपये होते. बाईकची प्री-बुकिंग सुरू झाली आहे. डिलिव्हरी मे २०२७ पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us