AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Avneet Kaur Song: 25 वर्षांची अवनीत कौर अन् 47 वर्षांचा इमरान हाश्मी, गाण्यातील डान्स स्टेप्समुळे खळबळ

Avneet Kaur Song: अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख स्टारर 'गनमास्टर G9' सिनेमा सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील बक्कळ कमाई करताना दिसत आहे. पण इमरान हाश्मी आणि अभिनेत्री अवनीत कौर हिच्या डान्स स्टेपमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनेकांना दोघांच्या डान्सवर टीका देखील केली आहे.

Avneet Kaur Song: 25 वर्षांची अवनीत कौर अन् 47 वर्षांचा इमरान हाश्मी, गाण्यातील डान्स स्टेप्समुळे खळबळ
Avaneet Kaur
| Updated on: Nov 29, 2026 | 1:25 PM
Share

Avneet Kaur Song: अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गनमास्टर G9’ (Gunmaaster G9) या सिनेमाची सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या या सिनेमाची पहिल्या दिवशीची सुरुवात संथ झाली होती. मात्र, त्यानंतर सिनेमाने कमाईच्या बाबतीत काहीशी गती पकडली. दरम्यान, सिनेमातील एका डान्समुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 25 वर्षीय अवनीत आणि 47 वर्षीय इमरान यांच्या डान्सवर अनेकांनी टीका केली आहे. सांगायचं झालं, सिनेमाची जेवढी चर्चा होत नाहीये, तेवढी चर्चा दोघांच्या डान्स स्टेपची होत आहे. ल

अवनीत कौरच्या डान्सवरून वाद

सिनेमात अभिनेत्री अवनीत कौर हिची कोणती भूमिका नाही, पण एका आयटम सॉन्गमध्ये अभिनेत्री दिसत आहे. या गाण्याच्या काही क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गाण्यात अभिनेत्रीला केवळ आकर्षणाचा विषय म्हणून सादर केलं जात असल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. एवढंच नाही तर, या गाण्याची तुलना ‘पेड्डी’ सिनेमातील जाह्नवी कपूरच्या डान्स नंबरशीही केली जात आहे.

डान्स स्टेप्सवर नेटकऱ्यांची नाराजी

अवनीतच्या डान्स स्टेप्सवर टीका करत एका युजरने सोशल मीडियावर लिहिलं की, अवनीत कौर नुकतीच 25 वर्षांची झाली असून तिच्याकडून अशा प्रकारच्या डान्स स्टेप्स का करून घेतल्या जात आहेत? अभिनेत्रींचं अशा प्रकारे लैंगिकीकरण करणे कधी थांबणार, असा सवालही त्याने उपस्थित केला.

दुसऱ्या एका युजरने अवनीतचे नवीन गाणं विचित्र आणि अयोग्य वाटल्याची प्रतिक्रिया दिली. डान्सवरुन वाद टोकाला पोहोचल्यानंतर, काही नेटकऱ्यांनी इमरान हाश्मी आणि अवनीत कौर यांच्या वयातील मोठ्या अंतराकडेही लक्ष वेधलं आहे. त्यामुळे या गाण्यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप सिनेमाच्या निर्मात्यांकडून किंवा अवनीत कौरकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

‘गनमास्टर G9’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘गनमास्टर जी9’ (Gunmaaster G9) हा सिनेमा 27 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. सिनेमात इमरान आणि जिनिलिया एकत्र दिसणार म्हणून चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचलेली. ‘गनमास्टर जी9’ने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 3.65 तर दुसऱ्या दिवशी 4.35 कोटींची नेट कमाई केली आहे. दोन दिवसांचं देशांतर्गत नेट कलेक्शन 8 कोटी रुपये झालं आहे. आता पुढे सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक,
बारामतीच्या पॉवर मॅरेथॉनमध्ये अजितदादांची आठवण; दत्तात्रय भरणे भावुक, सुनेत्रा पवारांचेही केले कौतुक!
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा...
आधी भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणाले, आता सोबत का घेताय? संजय राऊतांचा अमित शाहांना सवाल