बाईक घेण्याचा विचार सोडा, बाजारात येतेय CNG स्कूटर, देते 226 किमी रेंज, किंमत फक्त…
आता बाईक घेण्याचा विचार सोडून द्या, बाजारात येतेय 226 किमी धावणारी CNG स्कूटर. किंमत आणि कधी लाँच होणार ही स्कूटर? जाणून घ्या एका क्लिकवर

भारतीय दुचाकी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची लोकप्रियता वाढत असतानाच आता सीएनजीवर चालणाऱ्या स्कूटरचीही चर्चा सुरू झाली आहे. TVS मोटर कंपनीने विकसित केलेली TVS Jupiter 125 CNG ही स्कूटर प्रवासासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकते. या स्कूटरची झलक जानेवारी 2025 मध्ये दाखवण्यात आली होती. आता तिच्या संभाव्य लॉन्चबाबत उत्सुकता वाढली आहे. मात्र, कंपनीने अद्याप लॉन्चची तारीख आणि किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
TVS Jupiter 125 CNG मध्ये 124.8 सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.1 bhp पॉवर आणि 9.4 Nm टॉर्क निर्माण करते. सीएनजीवर चालणाऱ्या या स्कूटरमुळे इंधनाचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. उपलब्ध माहितीनुसार, एका सीएनजी फूल भरल्यास ही स्कूटर 226 किमीपर्यंत प्रवास करण्याचा दावा करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मायलेज हे वाहन चालवण्याची पद्धत आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.
सीटखालील स्टोरेजमध्ये मोठा बदल
या स्कूटरचे डिझाइन पेट्रोलवर चालणाऱ्या Jupiter 125 सारखेच असण्याची शक्यता आहे. मात्र, सीएनजी टाकीसाठी सीटखालील जागेचा वापर करण्यात आल्याने हेल्मेट किंवा इतर वस्तू ठेवण्यासाठी मिळणारे स्टोरेज कमी होणार आहे. तरीही पाय ठेवण्याच्या भागात वस्तू ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असेल.
किंमत किती असू शकते?
TVS Jupiter 125 CNG ची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही. अंदाजानुसार, पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत तिची किंमत 15 ते 20 हजार रुपयांनी अधिक असू शकते. त्यामुळे या स्कूटरची संभाव्य किंमत 95 हजार ते 1 लाख रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला मर्यादित संख्येत स्कूटर उपलब्ध करून दिली जाऊ शकते असाही दावा केला जात आहे.
डिसेंबर 2026 मध्ये लॉन्च होणार?
TVS Jupiter CNG डिसेंबर 2026 मध्ये बाजारात दाखल होऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र, याबाबत कंपनीकडून अधिकृत पुष्टी झालेली नाही. लॉन्चची तारीख, किंमत आणि उपलब्धता यांची स्पष्ट माहिती कंपनीच्या घोषणेनंतरच समोर येईल.
सीएनजीवरील कमी इंधनखर्च आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्तता यामुळे ही स्कूटर मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी आकर्षक ठरू शकते. मात्र, कमी स्टोरेज आणि सीएनजी भरण्याची उपलब्धता या बाबी ग्राहकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.