
इलेक्ट्रीक कारची सध्या चलती आहे. त्यामुळे प्रदुषणातून सुटका आणि पेट्रोलचा खर्च वाचतो असे म्हटले जात आहे. मात्र इलेक्ट्रीक कारचा एक भयानक अपघात होऊन त्या कारच्या ड्रायव्हरला बाहेरच पडता न आल्याने तो जीवंत जळाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे.
Xiaomi कंपनीच्या इलेक्ट्रीक कारला अचानक आग लागल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अपघातात जीवंत जळाल्याने ड्रायव्हरचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. ही माहिती ‘फ्री प्रेस जर्नल’ने दिली आहे. हा भयानक अपघात चीनच्या चेंगडू शहरात झाला आहे.
Xiaomi SU7 कारला हा अपघात झाला आहे. ही कार आधी एका डिव्हायडर धडकली. त्यानंतर कारला अचानक आग लागली. त्यामुळे तांत्रिक बिघाडाने कारचे दरवाजे लॉक झाले. या कारचा चालक कारमधून त्यामुळे बाहेर येऊच शकला नसल्याने त्याचा जीवंत भाजून मृत्यू झाल्याचे म्हटले जाते.
व्हिडीओत पाहू शकता की काही प्रवाशांनी या कारचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना कारचे दरवाजे उघडता आले नाहीत. वास्तविक प्रवाशांनी कारच्या खिडक्या तोडण्याचा प्रयत्न केला. कारचा दरवाजा लॉक झाल्याने या प्रवाशांचे प्राण वाचवता आले नसल्याचे उघड झाले आहे.
Xiaomi चीनी मोबाईल मॅन्युफॅक्चरनी काही वर्षांपूर्वी आपली ही इलेक्ट्रीक कार बाजारात आणली होती आणि चीनमध्ये या कारची विक्रीही सुरु झाली आहे. गेल्यावर्षी Xiaomi कंपनीने बंगळुरु येथे आयोजित एका मोबाईल ईव्हेंट दरम्यान Xiaomi SU7 कारला प्रदर्शितही केले होते. परंतू भारतात या कारला लाँच करण्यात आलेले नाही.
येथे पाहा व्हिडीओ –
A driver in China died after crashing his Xiaomi SU7 electric vehicle, which caught fire.
Following a power failure, the doors locked and rescue attempts failed.
Xiaomi shares fell about 9% after the incident.pic.twitter.com/zEQ44vJENJ
— Clash Report (@clashreport) October 13, 2025
Xiaomi च्या इलेक्ट्रीक कारच्या सुरक्षेवर या अपघातामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर या कंपनीविरोधात अनेकांनी आपला राग व्यक्त केला आहे. अनेक लोकांनी कंपनीला या अपघातील मृत्यूबद्दल जबाबदार धरले आहे. अनेक लोकांनी आता कारच्या आत सेफ्टी टूल्स आणि असेसरीज कायम ठेवण्याची मागणी केलेली आहे.त्यामुळे अपघातात कारचा दरवाजा लॉक झाला तर काचा तोडून संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग करता येईल.