Currency : गाजावाजा केला नी हाती भोपळा आला, 2000 रुपयांची नोट होणार का बंद?

| Updated on: Dec 13, 2022 | 7:14 PM

Currency : 2000 रुपयांची नोट बंद होणार आहे का?

Currency : गाजावाजा केला नी हाती भोपळा आला, 2000 रुपयांची नोट होणार का बंद?
या नोटेचं काय होणार?
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

नवी दिल्ली : भ्रष्टाचाराविरोधातील सर्वात मोठी कारवाई म्हणून नोटबंदीकडे (Demonetization) बघण्यात येते. वास्तविक नोटबंदीतून केंद्र सरकारचा (Central Government) काळ्या धनाचा फुगा फुटला. विरोधकांनी आकडेवारीसह नोटबंदीमुळे काळा पैसा कमी झाल्याचा दावा अमान्य केला. काळ्या पैशांविरोधात केलेल्या या व्यापक मोहिमेत 2000 रुपयांच्या नोटेने निर्णयाक भूमिका बजावली होती. पण आता गैरव्यवहारांसाठी आणि गुन्हेगारी कृत्यासाठी 2000 रुपयांच्या नोटेचाच सर्वाधिक वापर होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी (BJP MP) केला आहे.

त्यातच काळ्या पैशांविरोधातील केंद्र सरकारच्या मोहिमेतील सर्वात प्रभावी 2000 रुपयांची नोट बंद होणार असल्याचा जोरदार दावा करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत सोमवारी याविषयीचा प्रश्न विचारला. त्यामुळे केंद्र सरकारला घरचा आहेर मिळाला.

बिहारचे पूर्व उपमुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत शुन्य काळात हा प्रश्न विचारला. ‘बाजारात गुलाबी नोटांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. एटीएममधूनही 2000 रुपयांच्या नोटा येत नाही. त्यामुळे या नोटा वैध नसल्याचा प्रचार होत आहे.’ असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याची मध्यरात्रीपासून अंमलबजावणी ही झाली. काळे धन बाहेर येण्यासाठीचे हे पाऊल फार उपयोगी पडले नाही, हे नंतर आकडेवारीवरुन सिद्ध झाले.

दरम्यान ज्या वर्षी 2,000 रुपयांची नोट केंद्र सरकारने व्यवहारात आणली. त्या वर्षी 2,000 रुपयांच्या 2,272 नकली नोटा पकडण्यात आल्या. तर 2017 मध्ये ही संख्या 74,898 इतकी झाली. 2018 मध्ये 2,000 रुपयांच्या 54,776 नकली नोटा सापडल्या होत्या.

2019 मध्ये 2,000 रुपयांच्या 90,566 नकली नोटा सापडल्या. तर पुढील वर्षी तर नकली नोटांनी सर्व रेकॉर्ड मोडून काढले. 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या 2,44,834 नोटा सापडल्या होत्या.

खासदार मोदी यांनी स्पष्ट केले की, लोक मोठ्या प्रमाणात 2,000 रुपयांच्या नोटांचा गैर वापर करत आहे. त्यासाठी त्या दडवून ठेवण्यात येत आहेत. गैर प्रकारांसाठी आणि अवैध व्यापारासाठी या नोटांचा वापर होत आहे. अंमली पदार्थ, दहशतवादी कारवाया आणि इतर अनेक वाईट व्यवसायात या नोटांचा वापर होत आहे.

या नोटांचा गैर वापर लक्षात घेता त्या बंद करणे हितवाह असल्याचा दावा त्यांनी केला. आता डिजिटल चलन वाढल्याने या नोटा बंद कराव्यात. लोकांना 2,000 रुपयांच्या मोबदल्यात दुसऱ्या नोटा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली. अद्याप केंद्र सरकारने याविषयीचा कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.