8th Pay Commission: तुमच्या मासिक पगारात 15,000 रुपयांची वाढ होणार? 14% वेतन वाढीचा संपूर्ण हिशोब तपासा

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. ही अपडेट नेमकी काय आहे याबद्दल जाणून घ्या.

8th Pay Commission: तुमच्या मासिक पगारात 15,000 रुपयांची वाढ होणार? 14% वेतन वाढीचा संपूर्ण हिशोब तपासा
8th Pay Commission Salary Increase
| Updated on: Nov 28, 2026 | 12:55 PM

8th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ८ व्या वेतन आयोगाच्या संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म ‘जे.पी. मॉर्गन’ यांच्या अंदाजानुसार, ८ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक वेतनात/पेन्शनमध्ये सरासरी तब्बल १५,४०० रुपयांची वाढ होऊ शकते. याव्यतिरिक्त, प्रत्येक लाभार्थ्याला सरासरी सुमारे ३.४० लाख रुपयांची थकबाकी मिळणे अपेक्षित आहे. हा अंदाज जे.पी. मॉर्गनच्या ‘इंडिया इक्विटी स्ट्रॅटेजी २०२७’ या अहवालात मांडण्यात आला आहे. अहवालानुसार, आठव्या वेतन आयोगाचा लाभ सुमारे १.२ कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे. वेतन, भत्ते आणि पेन्शनच्या स्वरूपात सरकारवर पडणारा अतिरिक्त भार २०२८ आणि २०२९ या आर्थिक वर्षांत एकूण ७.२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

१.८३ फिटमेंट फॅक्टरचं गणित काय?

जेपी मॉर्गनने आपल्या अंदाजानुसार मूल्यमापनात १.८३ फिटमेंट फॅक्टरचा आधार घेतला आहे. यानुसार, सध्याचा १८,००० रुपयांचा किमान बेसिक सॅलरी वाढून सुमारे ३३,००० रुपये होऊ शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते, १.८३ फिटमेंट फॅक्टरमुळे कागदावर मूळ पगारात ८३% वाढ दिसून येत असली, तरी यामध्ये ६०% महागाई भत्ता (DA) मूळ पगारात विलीन केला जात आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष पगारात सुमारे १४% वाढ होईल असा अंदाज आहे.

Loading...

कर्मचारी संघटनांची मागणी काय?

दरम्यान, केंद्र सरकारी कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगासमोर ३.८३ फिटमेंट फॅक्टरची मागणी मांडली आहे. जर ही मागणी मान्य झाली, तर किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून वाढून सुमारे तब्बल ६९,००० रुपये होईल. याव्यतिरिक्त, कर्मचारी संघटनांनी वार्षिक वेतनवाढीचा दर सध्याच्या ३ टक्क्यांवरून वाढवून ६ टक्के करण्याचीही मागणी केली आहे.

जेपी मॉर्गनच्या अंदाजानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात. वाढलेला पगाराचे पगाराचे वाटप नोव्हेंबर २०२७ पासून सुरू होण्याची शक्यता आहे. परिणामी, जानेवारी २०२६ ते ऑक्टोबर २०२७ या २२ महिन्यांच्या कालावधीसाठी थकबाकी (arrears) जमा होईल. या ब्रोकरेज फर्मच्या मते, एकूण थकबाकीची रक्कम सुमारे ४ लाख कोटी रुपये असू शकते. ही रक्कम दोन आर्थिक वर्षांत दिली जाण्याची शक्यता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us