AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोन केला, बोलणं झालं, सगलं ठरलं पण…काँग्रेसमुळेच मिठाचा खडा, डिलिमिटेशनवर अमोल कोल्हेंचा संताप!

आमच्या पक्षाने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. आमचे आठही खासदार सोमवारी एकत्र बसतील. चर्चा करतील. त्यानंतर आम्ही याविषयी निर्णय घेणार आहोत. अशा प्रकारची विधानं ही दुधात मीठा खडा टाकण्याचे प्रकार आहेत, असा हल्लाबोल अमोल कोल्हे यांनी केला.

फोन केला, बोलणं झालं, सगलं ठरलं पण...काँग्रेसमुळेच मिठाचा खडा, डिलिमिटेशनवर अमोल कोल्हेंचा संताप!
amolh kolheImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 12:50 PM
Share

Amol Kolhe on Delimitation : शरद पवार यांच्या पक्षाकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला पवार यांच्या पक्षाचा प्रतिनिधी जाणार नाही. त्यामुळे पवारांची भूमिका काय याचा सस्पेन्स चांगलाच वाढलाय. दुसरकीडे पवार गट या विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता असल्याने राज्यातील काँग्रेसचे नेते सडकून टीका करत आहेत. शरद पवार यांच्यावरही टीका केली जात आहे. काँग्रेसच्या याच टीकेमुळे आता पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला झुम मिटिंगद्वारे उपस्थित राहणार होते. परंतु आता या बैठकीला उपस्थित राहण्याची गरज नाही, अशी मोठी भूमिका पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

आमच्या पक्षाने कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. आमचे आठही खासदार सोमवारी एकत्र बसतील. चर्चा करतील. त्यानंतर आम्ही याविषयी निर्णय घेणार आहोत. अशा प्रकारची विधानं ही दुधात मीठा खडा टाकण्याचे प्रकार आहेत. कारण इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रिया सुळे झुम कॉलद्वारे उपस्थित राहणार होत्या. या संदर्भात सुप्रिया सुळे आणि जयराम रमेश यांचं बोलणं झालं होतं. परंतु महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांकडून अशा प्रकारची विधानं सुरू झाल्यानंतर, पवारांच्या विषयी चुकीची विधानं झाल्यानंतर तर इंडिया आघाडीच्या बैठकीला आपण उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असं आम्ही सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय.

आमचे सर्व खासदार अभ्यास करतील. प्रत्येक खासदाराचे मत-मतांतर असेल. याविषयी आम्ही सगळे चर्चा करू. विधेयक चर्चेसाठी येईल. त्यानंतर आमचा पक्ष विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेणार आहे. संसदेच्या पटलावर आम्ही आमची भूमिका घेऊ. परंतु त्याआधी अभ्यास न करता आम्ही समर्थन करू किंवा विरोध करून असे सांगितले जात आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनीही टीका केली आहे. मतदारसंघ पूनर्रचना याआधी चार वेळा करण्यात आलेली आहे. त्यामुळे या विधेयकाला नेमका विरोध का होतोय हे मुद्दे समजणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या आठही खासदारांचं मत जाणून घ्यायचं आहे. आमची भूमिका जाहीर होण्याआधीच काँग्रसेचे नेते प्रतिक्रिया देत असतील तर ते दुर्दैवी आहे. सुप्रिया सुळे झुम कॉलद्वारे बैठकीला उपस्थित राहणार होत्या. सगळं ठरलं होतं. अकरा वाजता ही बैठक होणार आहे. परंतु साडे दहा वाजता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. याला आम्ही काय समजायचं. मग वडेट्टीवार आणि त्यांच्या राष्ट्रीय नेत्यात समन्वय नाही का? विजय वडेट्टीवार यांना समज द्यावी. मिठातला खडा कोण टाकतंय हे पाहणं गरजेचं आहे.

Follow Us
इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा....
DMK : इंडिया आघाडीला मोठा धक्का; डिलिमिटेशन विधेयकाला DMK चा पाठिंबा, राजकीय समीकरणं बदलणार?
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले
डिलिमिटेशन विधेयकावर अनिल देसाईंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका; म्हणाले, उद्धव ठाकरेंचा निर्णय...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं