AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा नातं बाजूला ठेवून लढलो, आजही तीच भूमिका… रोहित पवार यांच्या सूचक ट्विटने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसने डीलिमिटेशन विधेयकाला दिलेल्या पाठिंब्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या "तेव्हा नातं बाजूला ठेवून लढलो, अताही तीच भूमिका..." या सूचक ट्विटने अंतर्गत संघर्षाला वाट मोकळी करून दिली आहे. पक्षाच्या भूमिकेबद्दल काही नेत्यांमध्ये नाराजी असून, रोहित पवारांची स्वतंत्र भूमिका चर्चेचा विषय बनली आहे.

तेव्हा नातं बाजूला ठेवून लढलो, आजही तीच भूमिका... रोहित पवार यांच्या सूचक ट्विटने खळबळ
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 28, 2026 | 12:39 PM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीने डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे या बिलावरून पवार गटातच दोन प्रवाह असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप सोबत जाणं राष्ट्रवादीच्या या गटाला पचलेलं नसल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व गदारोळात शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. 2022 मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीने डीलिमिटेशन बिलाला पाठिंबा देणं आणि रोहित पवार यांचं ट्विट यांचा अचूक टायमिंग झाल्याने त्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाला 10 महिने पूर्ण झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अजितदादांसोबतचा फोटो शेअर केला आहे. अजितदादांना जाऊन आज 10 महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात/घातपात प्रकरणाचा ना एफआयआर झाला ना कुठला तपास झाला… आभाळाएवढा माणूस गेला, पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालंही सोयरसुतक नाही. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचं मी बघितले आणि बघतोय. पण काहीही झालं तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही, असं सांगतानाच 2022 मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो.आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल, असं रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

रोहित पवार वेगळ्या भूमिकेत?

दरम्यान, रोहित पवार यांनी राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात सातत्याने आंदोलने सुरू केली आहेत. रोहित पवार सरकारवर सातत्याने तुटून पडत आहेत. रोहित पवार यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्या मोर्चापासून राष्ट्रवादीने अंग काढून घेतलं होतं. त्यामुळे रोहित पवार पक्षात वेगळे पडल्याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीची बैठक होत असताना रोहित पवार यांनीही गुप्त बैठक घेतल्याची बातमी धडकली होती. त्यामुळे पवार गटात सर्व काही अलबेल नसल्याचं सांगितलं जात होतं. आताही राष्ट्रवादीने डीलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. पक्षाची ही भूमिका काही नेत्यांना पटली नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच आता रोहित पवार यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आम्ही अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही, असं सांगितलं. कालच बिलाचा मसुदा आला आहे. त्याचा आम्ही अभ्यास करणार आहोत. आमचे आठही खासदार अभ्यास करतील. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांची मते जाणून घेऊ. त्यानंतर निर्णय घेऊ, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. मात्र, आमची कोणतीही भूमिका आलेली नसताना बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी असा प्रकार सुरू झाल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे.

Follow Us
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हे...
सुप्रिया सुळे इंडिया आघाडीच्या बैठकीला का गेल्या नाहीत? अमोल कोल्हेंनी सांगितलं कारण
बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : बेधुंद कारभार सुरूय, सत्ता आणि पैशांसाठी सर्व काही चाललंय....
मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वे
Mumbai Megablock Update : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट; आज रात्रीपासून पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत....
Pune Police : महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीला पुणे पोलिसांनी म्हटलं जयंती; अधिकृत प्रसिद्धीपत्रकातील चुकीने उडाली खळबळ
डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले, म्हणाले....
Sanjay Raut : सत्तेच्या लालसेपोटी विचारांची माती केली...; डिलिमिटेशन बिलावरून संजय राऊत संतापले
जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी....
Nilesh Lanke : Delimitation Bill : जितेंद्र आव्हाडांनी पाठिंबा जाहीर केला, पण लंके म्हणाले... आधी विधेयकाचा मसुदा वाचणार
मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? पवारांच्या भूमिकेवर अंधारे संतापल्या....
Sushma Andhare : मविआत ठिणगी, आघाडीत मोठी फूट? शरद पवारांच्या भूमिकेवर सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या...
शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला
Vijay Wadettiwar : शरद पवारांचा इतिहास खंजीर खुपसण्याचा... विजय वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला; डिलिमिटेशन विधेयकावरूनही राष्ट्रवादीला सुनावलं
देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? डिलिमिटेशन बिलात काय आहे?
Delimitation Bill : देशाच्या राजकारणात मोठा बदल होणार? लोकसभेच्या जागा वाढणार, महिलांना आरक्षण मिळणार; डिलिमिटेशन बिलात काय आहे?
त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख
Rohit Pawar : त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाचं महाभारत घडतंय; रोहित पवार यांचा रोख नेमका कोणाकडे?