AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा

सध्या नाण्यांची किंमत चांगलीच वाढली आहे. जर तुमच्याकडेही काही जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे.

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! 5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा
| Edited By: | Updated on: Oct 09, 2020 | 11:16 AM
Share

नवी दिल्ली : ‘जुनं ते सोनं’ ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण जेव्हा भारतात नोटबंदी करण्यात आली तेव्हा मात्र सगळ्या जुन्या नोटा रोजच्या व्यवहारातून बाद करण्यात आल्या. यावेळी 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. पण आता सध्या नाण्यांची किंमत चांगलीच वाढली आहे. जर तुमच्याकडेही काही जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे. (after selling old rs 5 and rs 10 coins can make you millionaire)

कारण 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. इंडियामार्टच्या वेबसाईवर या नाण्यांना लोक 5 ते 10 लाखांच्या किंमतीवर विकत घेत आहेत. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर या वेबसाईवरून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पण या नाण्यांची नेमकी कशी विक्री करायची, जाणून घेऊयात…

जेव्हापासून जगात कोरोना व्हायरसचा फैलाव झाला आहे. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. काहींना अजूनही पगार मिळाले नाहीत. अशात बक्कळ पैसे कमवण्याची ही चांगली संधी आहे. खरंतर, लाख रुपये कमवण्यासाठी बराच वेळ लागतो. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा मार्ग सांगणार आहोत.

सध्या बाजारात 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची मागणी वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ती नाणी आहेत, ज्यांच्यावर वैष्णव देवीचा फोटो छापण्यात आला आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आलं होतं. देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आले आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे. (after selling old rs 5 and rs 10 coins can make you millionaire)

या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल 10 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. खरंतर, हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.

जगभरात अनेक लोक आहेत ज्यांना जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड आहे. इंडियामार्टवर अनेक लोक अशा जुन्या वस्तूंच्या शोधात येत असतात. त्यामुळे तुमच्याकडेही जर जुनी नाणी असतील तर लखपती होण्याची संधी घालवू नका.

इतर बातम्या – 

पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 तरुणांना वाहनाची धडक, जागीच मृत्यू

Coronavirus: घरातच कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका, बचावासाठी करा 3 उपाय

(after selling old rs 5 and rs 10 coins can make you millionaire)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.