Gold Rate : सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदी दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ…

जळगावातील सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दर सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झळ सोसावी लागणार आहे.

Gold Rate : सणासुदीच्या तोंडावर सोने आणि चांदी दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी दरवाढ...
gold rate market
| Updated on: Aug 21, 2026 | 7:27 PM

जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दर वाढ झाल्याने ग्राहकांना याची मोठी झळ बसणार आहे. येत्या 14 सप्टेंबर रोजी गणपती उत्सवाला सुरुवात होत आहे. त्यामुळे अनेकजण सोने आणि चांदीचे दागिने आणि इतर वस्तूंची गणपतीबाप्पाच्या स्वागतासाठी खरेदी करत असतात. त्यांना आता याची झळ बसणार आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांची तर चांदीच्या दरात 8 हजारांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संधीची दारे उघडी झाली आहेत, तर घरगुती सण- सोहळ्यासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना झळ बसणार आहे.

सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत आणि सोन्याचे दरात पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार रूपयांची तर चांदीच्या दरात 8 हजारांची मोठी वाढ झाली आहे.जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे दर आता 1 लाख 61 हजार 710 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीच्या दर जीएसटीसह 2 लाख 55 हजार 540 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत.

आज (21  ऑगस्ट 2026) मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचे दर सुमारे 1,59,270 ते 1,62,000 प्रति तोळा आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर सुमारे 1,46,000 प्रति 10 ग्रॅम ( तोळा ) आहेत. जीएसटी आणि मेकिंग चार्जला धरुन अंतिम किंमत वेगळी असू शकते.
  • 24 कॅरेट (शुद्ध सोने ): ₹1,59,270 – ₹1,62,000
  • 22 कॅरेट (दागिन्यांचे सोने ): ₹1,46,000 च्या आसपास
  • 18 कॅरेट सोने : ₹1,19,450 रुपयांच्या आसपास 

भारतीय बाजारात आज सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)पासून सर्वसामान्य सराफा बाजारापर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत आकाशाला भिडली आहे. आज सोन्याच्या दरात 1.60 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम गेली पाहिजे. तर चांदीच्या किंमतीत एका दिवसात एकाच दिवसात 2,300 रुपयांहून जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. या दरवाढीने जेथे गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळाली आहे तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी आता सणासुदीच्या सोने खरेदी आता आणखी महाग झाली आहे.

वायदा बाजारात (MCX) आजची सोन्याची स्थिती

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळपासूनच सोने आणि चांदीच्या दरात वृद्धी पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 5 ऑक्टोबरच्या एक्सपायरी वाले सोने 783 रुपये म्हणजे सुमारे 0.49 वाढीसह 1,60,208 रुपये प्रति 10 ग्रॅमवर कामकाज होत होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us