
विप्रो या आयटी कंपनीचे प्रमुख अझीम प्रेमजी बंगळुरुचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 1.9 लाख कोटी इतकी आहे. या यादीत अन्य अब्जाधीशात इरफान रज्जाक , नितीन कामथ, एस. गोपालकृष्णन आणि इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांचा समावेश आहे.

रियल इस्टेट बिझनेसमधील अब्जाधीश इरफान रज्जाक यांच्या संपत्तीत 178 टक्के वाढ झाली आहे. रिएल इस्टेट बिझनेसच्या यादीत रज्जाक 51 व्या स्थानावर आहेत.बंगळुरुच्या रज्जाक यांच्याकडे एकूण 43,000 कोटीची संपत्ती आहे. ते प्रेस्टीज ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

फायनान्शियल सर्व्हीसेस झेरोधा ( zerodha ) कंपनीचे सीईओ नितीन कामथ यांची संपत्ती 41,000 कोटी आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये ते 57 व्या स्थानावर आहेत. झेरोधा ही देशाची सर्वात मोठी डिस्काऊंट ब्रोकींग कंपनी आहे. कर्नाटकाच्या शिमोगात नितीन यांचा जन्म झाला असून त्यांनी कंप्युटर सायन्समध्ये BE डिग्री घेतली आहे.

हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये 62 व्या स्थानावर एस. गोपालकृष्णन हे देखील बंगळुरुचे असून ते इन्फोसिस कंपनीचे सह-संस्थापक आहे. त्यांनी साल 2007 ते 2011 पर्यंत कंपनीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आणि तर साल 2011 ते 2014 पर्यंत उपाध्यक्ष म्हणून काम केले. त्यांची एकूण संपत्ती 38,500 कोटी रुपये आहे.

इन्फोसिसचे आणखी एक सह संस्थापक एनआर नारायण मूर्ती 36,600 कोटी संपत्तीच्या बळावर या यादीत 69 व्या क्रमांकावर आहेत. नारायण मूर्ती साल 1981 ते 2002 पर्यंत इन्फोसिसचे सीईओ म्हणून काम पाहात होते.