
Who is Richest Muslim Businessman Azim Premji: भारतातील मुस्लीम समाज बांधवांनी कला, साहित्य, गायन यांनी कला क्षेत्रात मोठे नाव कमवले. परंतु उद्योग क्षेत्रात मुस्लीम समाज मागे आहे. परंतु देशात तीन पिढ्यांपासून उद्योग सांभाळणारा एक मुस्लीम परिवार आहे. 1947 मध्ये फाळणीच्या वेळी मोहम्मद अली जिन्ना यांनी त्यांना पाकिस्तानात बोलवले होते. परंतु त्या परिवाराने जिन्ना यांची ऑफर धुडकवली होती. त्या परिवाराने भारतात राहूनच आपला उद्योग वाढवला. आज तो परिवार देशातील सर्वात श्रीमंत मुस्लीम परिवार आहे. देशातील या सर्वात श्रीमंत मुस्लीम कुटुंबाचे नाव ‘प्रेमजी’ कुटुंब आहे. त्याचे प्रमुख अजीम प्रेमजी आहेत. ते विप्रो या आयटी कंपनीचे संस्थापक आहेत.
अझीम प्रेमजी यांचा जन्म 1945 साली मुंबईत झाला. त्यांचे वडील मोहम्मद प्रेमजी हे तांदळाचे व्यापारी होते. मुळात मोहम्मद प्रेमजी हे म्यानमारमध्ये व्यवसाय करत होते. पण 1940 मध्ये ते भारतात आले आणि इथेच स्थायिक झाले. देशाची फाळणी झाली तेव्हा मोहम्मद अली जिना यांनी अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद प्रेमजी यांना पाकिस्तानात येण्यास सांगितले. त्यांना अर्थमंत्री बनवण्याची ऑफरही दिली, परंतु मोहम्मद प्रेमजींनी नकार दिला.
अझीम प्रेमजींनी भारतात शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले. अझीम प्रेमजी यांचे मोठे भाऊ फारुख प्रेमजी यांनी त्यांच्या वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. पण 1965 मध्ये लग्नानंतर फारुख प्रेमजी आपले कुटुंब सोडून पाकिस्तानात गेले. एका वर्षानंतर मोहम्मद प्रेमजी यांचे निधन झाले आणि अझीम प्रेमजींना अमेरिकेतील शिक्षण सोडून भारतात यावे लागले. अझीम प्रेमजी यांना वडिलांच्या तेल व्यवसायाची जबाबदारी घेतली. त्या वेळी त्यांची कंपनीवर मोठे कर्जे होते. पण प्रेमजी यांनी कंपनीला करमुक्त करत तिचा विस्तारही केला. यानंतर त्यांनी अभियांत्रिकी आणि बॉडी केअर क्षेत्रात अनेक उत्पादने लाँच केली. 1977 मध्ये प्रेमजी यांनी आयटी क्षेत्रात प्रवेश केला. अझीम प्रेमजी यांनी कंपनीचे नाव विप्रो ठेवले. त्यांनी विप्रोला संगणक हार्डवेअर आणि नंतर सॉफ्टवेअर विकासाकडे वळवले.
अझीम प्रेमजी भारतातील 19 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या वृत्तानुसार, अझीम प्रेमजींची एकूण संपत्ती US$ 12.2 बिलियन आहे. विशेष म्हणजे अजीम प्रेमजीही देणगी देण्यात खूप पुढे आहेत. अझीम प्रेमजी हे 2021 मध्ये भारतातील परोपकारी अब्जाधीशांच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात ₹9,713 कोटी दान केले. म्हणजे रोज 27 कोटी रुपये ते दान देतात.