गेल्या तिमाहीत अंबानींनी जिओत किती कमावलं? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 23, 2021 | 8:12 AM

रिलायन्स जिओला झालेल्या नफ्याबद्दल बोलायचं झालं तर तिसऱ्या तिमाहीमध्ये 3,489 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 3,020 कोटी रुपये होता.

गेल्या तिमाहीत अंबानींनी जिओत किती कमावलं? वाचा सविस्तर
Reliance oxygen supplies patients
Follow us on

नवी दिल्ली : देशातील सगळ्यात आघाडीची आणि प्रसिद्धी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओच्या तिसर्‍या तिमाहीमध्ये नफ्यात मोठी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाहीतर कंपनीची प्रत्येक क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे. रिलायन्स जिओला झालेल्या नफ्याबद्दल बोलायचं झालं तर तिसऱ्या तिमाहीमध्ये 3,489 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा आकडा 3,020 कोटी रुपये होता. त्यामुळे तब्बल 15.5 टक्क्यांची नफ्यामध्ये वाढ झाल्याचं नोंदवलं गेलं आहे. रिलायन्सने आज त्यांचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामध्ये यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. (business news reliance jio profitability increased sharply in the third quarter)

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलायन्स जिओचं आर्थिक परिणाम म्हणजे रिलायन्स जिओच्या शुद्ध नफ्याविषयी माहिती देण्यात आली आहे. हा निव्वळ नफा तिसऱ्या तिमाहीत 3,489 कोटींनी वाढला आहे. तिसर्‍या तिमाहीमध्ये रिलायन्स जिओला व्हॅल्यू एडिड सर्व्हिसेसकडून 22,858 रुपयांचा नफा झाला, तर दुसऱ्या तिमाहीत हाच नफा 21,708 रुपये झाला. म्हणजेच यामध्ये 5.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानुसार, तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स जिओचा एकूण महसूल 19,475 कोटी रुपये होता. दुसर्‍या तिमाहीत हे उत्पन्न 18,496 रुपये होतं.

यामध्ये रिलायन्स जिओचा तिसर्‍या तिमाहीत एबिटडा 8,483 कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत हा 7,971 कोटी रुपये होता. म्हणजेच यामध्ये 6.4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तोच एबिटा मार्जिन तिसऱ्या तिमाहित वाढून 43.6 टक्के झाला आहे. जो दुसऱ्या तिमाहित 43.1 टक्के होता. एकूणच यामध्ये तब्बल 46 बेसिस प्वाईटने वाढ झाली आहे.

या सगळ्या वाढलेल्या आकड्यांमुळए रिलायन्सचा निव्वळ नफा वाढला असून तिसर्‍या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा 12 टक्के फायदा झाला आहे. एकीकडे मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा 11,640 कोटी रुपये होता. तर दुसरीकडे चालू आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न 1,57,165 कोटी रुपयांवरून घसरून 1,28,450 कोटी रुपयांवर आलं आहे. (business news reliance jio profitability increased sharply in the third quarter)

संबंधित बातम्या – 

नांदेड परभणीत देशात सर्वाधिक महाग पेट्रोल, शंभरीकडे वाटचाल, वाचा आजचे भाव !

दागिने बनवायचे असतील तर उशिर करू नका, सोन्या-चांदीचे भाव घसरले

अचानक पैशांची गरज आहे तर SBI करेल मदत, जाणून घ्या काय आहे खास योजना?

(business news reliance jio profitability increased sharply in the third quarter)