सोनं खरेदी करताना सावधान… देश हादरवणारी माहिती उघड; 83 टक्के सराफाची दुकाने…

कॅगच्या अहवालानुसार, भारतीय मानक ब्यूरो (BIS) ने 83 टक्के पेक्षा जास्त नोंदणीकृत सराफा दुकानांची तपासणीच केली नाही. यामुळे हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या शुद्धतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्राहक डोळे मिटून खरेदी करत असले तरी, फसवणुकीचा धोका वाढला आहे. ग्राहकांनी सोनं खरेदी करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

सोनं खरेदी करताना सावधान... देश हादरवणारी माहिती उघड; 83 टक्के सराफाची दुकाने...
CAG report gold inspection
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 1:02 PM

सोन्यावर हॉलमार्क लिहिलेलं असेल तर ग्राहक डोळे बंद करून सोनं खरेदी करतात. सोन्यावर सरकारी ठसा उमटलेला आहे, त्यामुळे हे सोनं 100 टक्के खरं असेल, असं ग्राहकांना वाटतं. पण ग्राहकांनाच नव्हे तर देश हादरवणारी बातमी समोर आली आहे. नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगने एका ताज्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती दिली आहे. या रिपोर्टमध्ये सोन्याच्या शुद्धतेवर देखरेख करणारी संस्था भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या निष्काळजीपणावर कॅगने कठोर ताशेरे ओढले आहेत. BIS ने 83 टक्क्याहून अधिक सोन्याची दुकाने तपासलीच नसल्याचं उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

नियमानुसार, BISने वर्षातून कमीत कमी एकदा तरी सर्व रजिस्टर्ड ज्वेलर्सच्या दुकानात जायला पाहिजे. तिथे जाऊन सोन्याच्या दागिण्याची शुद्धता तपासली पाहिजे. पण कॅगच्या रिपोर्टनुसार, वास्तवात असं काही होताना दिसतच नाहीये. सोन्याच्या शुद्धतेकडेच लक्ष नसल्याने बाजारात विकण्यात येणाऱ्या हॉलमार्कच्या सोन्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

Loading...

आकडेवारीने पोलखोल

कॅगच्या ड्राफ्ट रिपोर्टमध्ये गेल्या पाच वर्षातील (2020-21 पासून 2026 पर्यंत)च्या कामकाजाचा लेखाजोखा देण्यात आला आहे. या पाच वर्षात 83 टक्क्याहून अधिक नोंदणीकृत ज्वेलर्सची वार्षिक तपासणी करण्यात आलेली नाही. केवळ आर्थिक वर्ष 2024-25 चे आकडे पाहिले तर, या दरम्यान 28,865 परवानाधारक ज्वेलर्सपैकी केवळ 5,444 सराफा दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. याचा अर्थ 81.13 टक्के सराफा व्यावसायिक कोणत्याही तपासणीशिवाय आपलं कामकाज करत आहेत.

हा निष्काळजीपणा केवळ ज्वेलर्सच्या दुकानापर्यंतच मर्यादित नाहीये. तर ज्या हॉलमार्किंग केंद्रात (AHCs) वर सोन्याची शुद्धता तपासल्यावर 6 आकड्याचा यूनिक नंबर (HUID) जारी केला जातो, त्याचीही निगराणी झालेली नाहीये. रिपोर्टनुसार, या केंद्रांच्या निगराणीसाठी ठरलेल्या टार्गेटमध्येही BIS 43.7 टक्क्याने मागे राहिला आहे. जेव्हा तपासणी करणाऱ्या केंद्रांवरच पूर्ण निगराणी ठेवली जात नाही तर दागिण्याच्या शुद्धतेची गॅरंटी कशी दिली जाऊ शकते?

ग्राहकांच्या खिशाला झळ

सध्या देशात 398 जिल्ह्यांमध्ये बिना हॉलमार्कचं सोनं विकणं पूर्णपणे बेकायदेशीर आहे. देशभरात सुमारे 2.3 लाख सोन्याची दुकाने BIS कडे नोंदणीकृत आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने हॉलमार्किंग कंपल्सरी केलं होतं. पण 80 टक्के दुकानांची तपासणीच होत नाहीये. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची आणि त्यांच्या खिशाला झळ पोहोचण्याची दाट शक्यता वाढली आहे.

BIS चं म्हणणं फेटाळलं

ही मोठी चूक उघड झाल्यानंतर BIS कडून उत्तर मागण्यात आलं होतं. यावेळी BIS ने कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा बहाणा दिला होता. लांब लांबच्या भागातून सोन्याचे सँपल आणण्यात अडचणी येत असतात, असं BIS ने म्हटलं होतं. पण BISचे हे दावे कॅगने फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणी केंद्र सरकारच्या उत्तराची अपेक्षा आहे. हा रिपोर्ट संसदेत मांडला जाणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us