ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट

| Updated on: Feb 04, 2021 | 9:42 AM

ईडीने पुरवलेलं साहित्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी पुरेसं असल्याचंही यावेळी कोर्टाने म्हटलं.

ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मोठा धक्का, कोर्टाकडून पोस्टचा गैरवापर केल्याचं स्पष्ट
Follow us on

मुंबई : मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) च्या विशेष कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉन ग्रुपच्या व्ही.एन. धूत यांना कर्ज देताना आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला. इतकंच नाही तर पती दीपक यांच्यामार्फत बेकायदेशीररित्या नफा मिळवला असल्याचं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (chanda kochhar looks to have misused post court have adequate evidence for hearing)

3 फेब्रुवारी रोजी विशेष कोर्टाने दिलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ने जी सामग्री उपलब्ध केली आहे, ती आयसीआयसीआय बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि इतरांविरूद्ध मनी लाँड्रिंग (PMLA)प्रकरणात सुनावणी करण्यासाठी पुरेशी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

30 जानेवारी रोजी ईडीच्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्टच्या आरोपपत्रात दखल घेत कोचर, त्यांचा पती दीपक कोचर, व्हिडिओकॉन समूहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत आणि इतर आरोपींना समन्स बजावले गेले होते. बुधवारी दिलेल्या आदेशानुसार, न्यायाधीश ए.ए. नंदगावकर म्हणाले की, पीएमएलए अंतर्गत पुरवल्या गेलेल्या साहित्याची माहिती, लेखी तक्रारी आणि नोंदवलेल्या निवेदनातून असं दिसून आलं की, चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. यातून त्यांनी धूत आणि व्हीडिओकॉन समूहातील कंपन्यांना कर्ज दिलं.

इतकंच नाही तर ईडीने पुरवलेलं साहित्या आरोपींवर कारवाई करण्यासाठी पुरेसं असल्याचंही यावेळी कोर्टाने म्हटलं. दरम्यान, “सर्व आरोपींना 12 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं गेलं आहे. ईडीने सप्टेंबर 2020 मध्ये सीबीआयच्या चंदा कोचर, तिचा नवरा आणि धूत आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून दीपक कोचर यांना अटक केली.

नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेने 3250 कोटींचं कर्ज दिल्याचं हे प्रकरण आहे. एकूण 40 हजार कोटींच्या कर्जाचा हा एक भाग होता, जे व्हिडीओकॉनने एसबीआयच्या नेतृत्त्वात 20 बँकांकडून घेतलं होतं. 2010 मध्ये 64 कोटी रुपये न्यूपॉवर रिन्युएबल प्रायव्हेट लिमिटेड (NRPL) ला दिले. ही कंपनी धूत यांनी दीपक कोचर आणि इतर दोन नातेवाईकांसह मिळून उभी केली, असा आरोप आहे.

चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कर्जदाराकडून आर्थिक लाभ दिले गेले, असाही आरोप करण्यात आलाय. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर सहा महिन्यातच धूत यांनी कंपनीची मालकी दीपक कोचर यांच्या ट्रस्टला केवळ नऊ लाख रुपयांमध्ये विकल्याचाही आरोप आहे.

ईडीने या प्रकरणात चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत आणि इतरांविरोधात बँकेच्या कर्जात हेराफेरी आणि PMLA अंतर्गत गुन्हा दाखल केला. (chanda kochhar looks to have misused post court have adequate evidence for hearing)

संबंधित बातम्या –

शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय…. सामनाने फडणवीसांना फटकारलं, निश्चिंत रहा बेड्या पडतील !

सावधान! मुंबईत निकृष्ट आणि भेसळयुक्त खाद्यतेलाचा मोठा साठा जप्त

जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याच्या वजनकाट्यांची अचानक तपासणी, अहवाल काय?

(chanda kochhar looks to have misused post court have adequate evidence for hearing)