Inflation : महागाईच्या आघाडीवर पुन्हा आनंदवार्ता! किरकोळ महागाई दर घसरला

| Updated on: Jan 12, 2023 | 11:06 PM

Inflation : महागाई घटल्याच्या वार्ताने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Inflation : महागाईच्या आघाडीवर पुन्हा आनंदवार्ता! किरकोळ महागाई दर घसरला
Follow us on

नवी दिल्ली : महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाईच्या आघाडीवर डिसेंबर महिन्याने ही आनंदवार्ता आणली आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दरात (CPI) घसरण दिसून आली. गुरुवारी याविषयीची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. आकड्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये महागाई दर ( CPI Inflation) 5.72 राहिला. यामुळे सलग तीन महिन्यात महागाईच्या आघाडीवर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यान्न आणि खाद्य पदार्थांचे भाव घसरल्याने किरकोळ महागाई दरात घसरण झाली.

ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारीत किरकोळ महागाई नोव्हेंबर 2022 मध्ये 5.88 टक्के आणि गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये 5.66 टक्के होती. दोन वर्षांपूर्वीच्या आकड्यांवर नजर टाकली असता हे आकडे दिलासा देणारे ठरले आहेत.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार डिसेंबर महिन्यात खाद्यपदार्थांचा महागाई दर 4.19 टक्के होता. हाच दर नोव्हेंबर महिन्यात 4.67 टक्के होता. त्याअगोदर हा दर अधिक होता. याचा परिणाम भविष्यात दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

सीपीआयच्या डाटा आधारानुसार, ग्रामीण महागाई दर 6.09 वरन घसरला आणि हा दर 6.05 टक्क्यांवर आला. तर शहरातील महागाई दर ही घसरला. हा दर 5.68 हून 5.39 वर घसरला. तर मूळ चलनवाढीचा दर 6 टक्क्यांवरून 6.1 टक्क्यांवर पोहोचला आहे.

औद्योगिक उत्पादन दर नोव्हेंबर 2022 मध्ये 7.1 टक्के वाढला आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा दर घसरला होता. गुरुवारी याविषयीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकड्यानुसार, औद्योगिक उत्पादन सूचकांक नोव्हेंबर 2021 मध्ये एक टक्क्यांची वाढ झाली.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकड्यानुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये उत्पादन क्षेत्रात 6.1 टक्क्यांनी वाढ झाली. तर, या महिन्यात खाण उत्पादनात 9.7 टक्के आणि वीज उत्पादनात 12.7 टक्के वाढ झाली आहे.