कच्च्या तेलाचे भाव वाढले; पेट्रोल, डिझेल आणखी महागणार?

| Updated on: Nov 30, 2021 | 2:06 PM

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण सुरू होती. मात्र  पुन्हा एकदा  कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी दिसून आली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कच्च्या तेलाचे भाव वाढले; पेट्रोल, डिझेल आणखी महागणार?
पेट्रोल-डिझेल
Follow us on

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण सुरू होती. मात्र  पुन्हा एकदा  कच्च्या तेलाच्या दरामध्ये तेजी दिसून आली आहे. कच्च्या तेलाचे भाव सातत्याने कमी होत होते, त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या कीमती कमी होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र आता कच्चे तेल महागल्याने इंधनाच्या कीमती वाढण्याची शक्यता आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कच्च्या तेलाचे दर वधारले आहेत. क्रुड ऑईलच्या दरामध्ये 1.1 टक्क्यांची वाढ होऊन, भाव 74.26  डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत.

इंधनाचे दर स्थिर

भारतात मात्र सलग 26 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. कच्चे तेलाचे दर कमी होत असताना देखील इंधनाच्या किमतीमध्ये कोणतीही कपात करण्यात आली नव्हती हे विशेष. 26 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल, आणि डिझेलच्या उत्पादनशुल्कामध्ये कपात केली होती. उत्पादन शुल्क कमी झाल्याने पेट्रोलचे दर 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले होते. त्यानंतर गेल्या 26 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

आजचे दर

साधारणपणे कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल, डिझेलचे दर अवलंबून असातत. कच्च्या तेलाचे दर वाढले की पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढतात आणि दर कमी झाले तर इंधनाचे दर देखील कमी होतात. भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 103.97 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या 

आज सादर होणार दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी; ग्रोथ रेट 9 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप