आज सादर होणार दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी; ग्रोथ रेट 9 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज

आज चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या तिमाहीत जुलाई ते सप्टेंबरदरम्यान जीडीपीचा दर सात ते नऊ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आज सादर होणार दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी; ग्रोथ रेट 9 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज
India's GDP

नवी दिल्ली : आज चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या तिमाहीत जुलाई ते सप्टेंबरदरम्यान जीडीपीचा दर सात ते नऊ टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपीत मोठी घट झाली होती. जीडीपी तब्बल 7.5 टक्क्यांनी घसरला होता. गेल्या वर्षी कोरोनाचा मोठा फटका हा अर्थव्यवस्थेला बसला. कोरोनामुळे अनेकांना आपले रोजगार गमावावे लागले होते. परिणामी जीडीपीमध्ये देखील घसरण झाली.

पहिल्या तिमाहीत तेजी 

चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये तेजी दिसून आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपीमध्ये तब्बल 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे पहायला मिळाले. दरम्यान चालू तिमाहीमध्ये जीडीपीचा दर हा काय राहातो, यावर पुढील वाटचाल अवलंबूल असणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये जीडीपीचा ग्रोथ रेट हा 9.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयकडून वर्तवण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्रोथरेट वाढण्याची शक्यता

दरम्यान देश आता कोरोना संकटातून बाहेर पडत असून, सर्व उद्योगधंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. कोरोना काळात अनेकांनी आपले रोजगार  गमावेले होते. गेल्या आर्थिक वर्षात कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. मात्र आता या सर्व परिस्थितीतून देश सावरत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जीडीपीमध्ये तेजी पहायला मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

घरांसाठी म्हाडा पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील जमीनी ताब्यात घेणार; संबंधित विभागाकडे प्रस्ताव दाखल

आता असंघटीत क्षेत्रातील मजुरांनाही मिळणार पेन्शन; ‘असे’ असेल योजनेचे स्वरूप

कारभारात त्रुटी असल्याचा ठपका; आरबीआयकडून रिलायन्स कॅपिटलचे संचालक मंडळ बरखास्त

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI