दंत कांती ते एलोव्हेरा जेल, इतका मोठा आहे पंतजलीचा कारभार

पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीने तिच्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांत सुमारे ७२ टक्के परतावा दिला आहे. ही कंपनी एफएमसीजी सेक्टरमध्ये आणखी मजबूत होत आहे.

दंत कांती ते एलोव्हेरा जेल, इतका मोठा आहे पंतजलीचा कारभार
| Updated on: Sep 10, 2025 | 8:55 PM

देशाची सर्वात प्रसिद्ध एफएमजी कंपनी पतंजलीचा व्यवसाय देशभरात वाढत आहे. बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली फूड्सच्या एमएमसी सेक्टरने आपली वेगळी ओळख बनवली आहे. आता कंपनी दंतकांती,एलोव्हेरापासून कृषी प्रोडक्ट्स आणि एडिबल ऑईलचा व्यापार करते आहे. तर चला पाहूयात कंपनीचा कारभार किती करोडचा आहे.

पंतजली फूड लिमिटेड कंपनी आता शेअर मार्केटमध्ये लिस्टेड आहे. कंपनीने जेव्हापासून लिस्ट झालीय तेव्हा पासून गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. जर गेल्या पाच वर्षांचा विचार करता पतंजली फूड लिमिटेडच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना सुमारे ७२ टक्के शानदार रिटर्न दिला आहे. पाच वर्षांपूर्वी कंपनीचे शेअर १,०४० रुपयांना होते. आज त्यांची किंमत ७४३.९० रुपयांनी वाढून १,७८४ रुपये झाली आहे.

कंपनीचा कारभार –

पतंजली फूड लिमिटेड एफएमसीजी सेक्टरच्या प्रसिद्ध कंपन्यांना टक्कर देत आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनी मोठी वाढ केली आहे. गुंतवणूकदारांना शानदार नफा कमावला आहे. बीएसईवर कंपनीचे मार्केट कॅप ६४,७५८ कोटी रुपये आहे.

पतंजली फूड्समध्ये खास एडिबल ऑईल

आर्थिक वर्षे २०२४ मध्ये पतंजली फूड्स लिमिटेडचा सर्वात जास्त महसूल म्हणजे सुमारे ७० टक्के हिस्सा, एडिबल ऑईल सेगमेंटपासून आलेला आहे. कंपनीचा फूड आणि उर्वरित FMCG प्रोडक्ट्सचा नंबर होता. ज्यांचा रेव्हेन्यू शेअर सुमारे ३० टक्के होता. पतंजली फूड्स एक भारतीय FMCG कंपनी असून भारतात कंझ्युमर प्रोडक्ट्स आणि खाद्यतेल बनवते. खास बाब म्हणजे पतंजलीचे प्रोडक्ट्स मागणी लागोपाठ वाढली आहे, ज्यामुळे कंपनीचा रेव्हेन्यू आणि प्रॉफिट वेगाने वाढत आहेत.

पतंजली हे प्रोडक्ट्स विकतात

पतंजली फूड प्रोडक्ट्स,पर्सनल केअर प्रोडक्ट्स आणि आयुर्वेदिक औषधे विकते. फूड प्रोडक्ट्समध्ये घी, पीठ, डाळ, नूडल्स,बिस्कीट्स आणि गुलाम जामून, रसगुल्ला सारख्या मिठाई देखील सामील आहेत. पर्सनल केअरमध्ये शॅम्पू,टुथपेस्ट, साबण, तेल वैगरे. याशिवाय आयुर्वेदिक औषधे देखील बनवली जातात. या औषधांनी अनेक व्याधी दूर होतात. पतंजलीचे संपूर्ण देशात ४७,००० हून जास्त रिटेल स्टोर्स, ३,५०० वितरक आणि १८ राज्यात अनेक गोदाम आहेत.