Explainer : केमोथेरपीच्या वेदनेतून सुटका होणार ? नवी कॅन्सर लस किती प्रभावी ठरणार ?
कॅन्सरच्या विरोधात लढणाऱ्या रशियन संशोधकांनी कॅन्सरवर व्हॅक्सीन शोधून काढली आहे. त्यामुळे आता कॅन्सरने होणारे मृत्यू रोखता येणार का ? ही व्हॅक्सीन MRNA तंत्राने तयार झाली आहे हे तंत्र नेमके का? यामुळे केमोथेरपीच्या वेदनेतून रुग्णांची सुटका होणार का ? चला पाहूयात

जगभरात वेगाने पसरणाऱ्या कॅन्सर आजारा संदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रशियाच्या संशोधकांनी आता कॅन्सरची व्हॅक्सीन ( Cancer Vaccine ) तयार केली आहे. या व्हॅक्सीनद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट केले जाऊ शकते असा दावा रशियन तज्ज्ञांनी केला आहे. या कॅन्सर लसीची पहिली क्लिनिकल ट्रायल देखील यशस्वी झाली आहे. चला तर पाहूयात ही व्हॅक्सीन कशी काम करते ? कॅन्सरची प्रकरणे जगभरात वाढत आहेत. गेल्या काही वर्षांत कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूंचा आकडाही खूप वाढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात दर ९ व्या आणि १० व्या व्यक्तीच्या जीवनात कॅन्सरचा धोका आहे.२०२४ मध्ये भारतात सुमारे १६ लाख...
