AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगारेट ते बँकिंग ट्रान्झॅक्शनपर्यंत सर्व काही महागलं; बजेटच्या दिवशीच नवे नियम लागू

१ फेब्रुवारी २०२६ पासून देशात अनेक मोठे आर्थिक बदल लागू झाले आहेत. यामध्ये गॅस सिलिंडरचे दर, SBI चे नवीन बँकिंग शुल्क, क्रेडिट कार्डचे नियम आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतींमधील वाढीचा समावेश आहे. या बदलांचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

सिगारेट ते बँकिंग ट्रान्झॅक्शनपर्यंत सर्व काही महागलं; बजेटच्या दिवशीच नवे नियम लागू
New Rules
| Updated on: Feb 01, 2026 | 8:44 AM
Share

आज १ फेब्रुवारी २०२६, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे सर्वांचे डोळे लोकसभेत सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे (Budget 2026) लागलेले असताना दुसरीकडे महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. आजपासून तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरच्या किमतींपासून ते खिशातील क्रेडिट कार्डच्या नियमांपर्यंत आणि महामार्गावरील फास्टॅगपासून ते बँकेतील व्यवहारांपर्यंत अनेक ठिकाणी मोठे बदल झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या मासिक बजेटवर आणि दैनंदिन जीवनशैलीवर होणार आहे. यामुळे तुम्हाला काही ठिकाणी दिलासा तर काही ठिकाणी वाढीव खर्चाचा बोजा सोसावा लागणार आहे.

गॅस सिलिंडर आणि इंधन दरवाढीचे संकेत

दर महिन्याप्रमाणे आजही तेल कंपन्यांनी एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र घरगुती गॅसबाबत अद्याप कोणती मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता याबद्दल अर्थसंकल्पातून काही दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यासोबतच सीएनजी (CNG) आणि विमान इंधनाच्या (ATF) दरात होणाऱ्या बदलांमुळे तुमचा प्रवास खर्चही वाढण्याची शक्यता आहे.

बँकिंग आणि क्रेडिट कार्डचे नियम कडक

बँकिंग क्षेत्रात आजपासून दोन मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

SBI चे व्यवहार महागणार: स्टेट बँक ऑफ इंडियाने IMPS शुल्कात बदल केला असून, १५ फेब्रुवारीपासून २५,००० रुपयांवरील ऑनलाईन व्यवहारांवर २ ते १० रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क (अधिक GST) द्यावे लागेल.

क्रेडिट कार्ड ऑफर्सना कात्री: HDFC बँकेने रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्यावर मर्यादा आणली आहे, तर ICICI बँकेने काही कार्ड्सवर मिळणारी मोफत चित्रपट तिकीट ऑफर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

PNB ग्राहकांसाठी डेडलाईन: पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना त्यांचे KYC अपडेट करण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंतची शेवटची संधी आहे, अन्यथा खात्यातून व्यवहार करणे कठीण होईल.

वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

रस्ते आणि वाहतूक विभागाने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता FASTag साठी वाहन मालकांना वारंवार बँकेत जाऊन KYC पडताळणी करण्याची गरज भासणार नाही. ही सर्व जबाबदारी आता संबंधित बँकांकडे सोपवण्यात आली असून, यामुळे वाहनधारकांचा वेळ वाचणार आहे.

व्यसने होणार महाग

आरोग्यासाठी घातक असलेल्या सिगारेट, पान मसाला आणि गुटखा यांसारख्या तंबाखूजन्य पदार्थांवर सरकार अतिरिक्त कर (Cess) लावण्यात येणार आहे. यामुळे आजपासून सिगारेट, पान मसाला आणि गुटखा या वस्तूंच्या किमतीत वाढ होऊन शौकिनांच्या खिशाला चांगलाच फटका बसू शकतो.

Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड